कमिशनखोरीमुळे नागपूर जलमय : नाना पटोले 

सिमेंट रस्ते बांधण्याचे कंत्राट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळच्या लोकांना दिले आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या या कमिशनखोरीमुळे नागपूरच्या रस्त्यांची बांधकामे निकृष्ट झाल्याने एका पावसाने नागपूर जलमय झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला.
कमिशनखोरीमुळे नागपूर जलमय : नाना पटोले 

नागपूर : सिमेंट रस्ते बांधण्याचे कंत्राट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळच्या लोकांना दिले आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या या कमिशनखोरीमुळे नागपूरच्या रस्त्यांची बांधकामे निकृष्ट झाल्याने एका पावसाने नागपूर जलमय झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला. 

सिमेंटचे रस्ते बांधल्यामुळे नागपुरातील रस्त्यांचा नैसर्गिक उतार नष्ट झाला असून सिमेंटचे रस्ते उंच झाले असून इमारतीसमोर सखल भाग निर्माण झाले आहे. या सखल भागात पाणी साचत असल्याने घरांमध्ये पाणी शिरले. साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नसल्याने नागपूर पाण्यात बुडाले. नागपूरच नव्हे तर विदर्भाची शान असलेल्या विधानभवनात पाणी साचल्याने विधिमंडळाचे कामकाज बंद करण्याची नामुष्की सरकारवर आली. 

नागपुरातील सिमेंट रस्त्याचे निकृष्ट बांधकाम हे यासाठी जबाबदार असल्याचे सांगून पटोले म्हणाले, नागपुरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाचे कंत्राट ओळखीच्या लोकांना दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या "जवळ'च्या लोकांना या रस्त्यांचे कंत्राट दिले आहेत. या रस्त्यावर कोसळणारे पाणी कुठे जाईल, याचे कोणतेही नियोजन केलेले नाही. महापालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी व्यवस्थापन विभागाने या संदर्भात इशारा दिला होता. या इशाऱ्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष का केले. पहिल्याच पावसाने शहरातील अनेक सिमेंटच्या रस्त्यांना भेगा कशा पडल्या? एकाच पावसाने सिमेंटचे रस्ते कसे उखडले? सिमेंट रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी ड्रेनेज कां केले नाही? असे प्रश्‍न पटोले यांनी विचारले आहेत. कंत्राटदारांकडून कमिशनखोरीमुळे याकडे दुर्लक्ष करण्यात आले काय? असा सवाल पटोले यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com