तुकाराम मुंडे येणार हे कळताच महापालिका अधिकारी धास्तावले !

तुकाराम मुंडे जिथे गेले तेथे पदाधिकारी आणि पुढाऱ्यांशी त्यांचे पंगे झाले आहेत. काटेकोर नियम पाळत असल्याने त्यांच्याशी कोणाचेच पटत नाही. सत्ताधाऱ्यांना पटापट कामे कारायची घाई असल्याने मुंडे यांच्याशी त्यांचे कधीच पटले नाही.
Tukaram-Munde.
Tukaram-Munde.

नागपूर : तुकाराम मुंडे नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून  येणार हे कळताच महापालिका अधिकारी धास्तावले आहेत .  महापालिकेचे अनेक  कर्मचारी गुरुवारी  चक्क वेळेवर मनपा कार्यालयात दाखल झाले . विशेष म्हणजे एरव्ही बऱ्याचदा वेळेवर न येणारे  किंवा फिल्ड व्हिजिटच्या नावाखाली  दांड्या मारणारे अधिकारीही दहाच्या ठोक्याला मनपाच्या कार्यालयात दाखल झाले . 


महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांच्या बदलीचे आदेश धडकताच ते केव्हा रुजू होणार याचीच चर्चा गेले दोन दिवस दिवसभर महापालिकेत रंगली होती. त्यांच्या कारवाया आणि किश्‍श्‍यांमुळे महापालिकेतील कर्मचारीसुद्धा धास्तावले असल्याचे दिसून येते.  

  नागपूर जिल्हा परिषदेत तुकाराम मुंडे  मुख्याधिकारी होते. येथे रुजू होताच पहिल्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेटी दिल्या होत्या. अनुपस्थित असलेल्या शिक्षकांना निलंबित केले होते. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप त्यांनी बंद केला होता. त्यामुळे पदाधिकारी चांगलेच नाराज झाले होते. त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला होता.  

  आतापर्यंत तेरा वेळा त्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी दहा बदल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींवरून झाल्या आहेत.


 युतीची सत्ता गेली आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासूनच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात तुकाराम  मुंडे यांना पाठविण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. ते खरेही ठरले आहे. नागपूर महापालिकेत सुमारे तेरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच महापालिकेत महापौरसुद्धा राहिले आहे.

त्यामुळे मुंडे यांना मुद्दामच पाठविण्यात आल्याचाही चर्चा यानिमित्ताने होत आहे. मुंबई, नाशिक महापालिका आयुक्त असताना मुंडेंचे लोकप्रतिनिधींशी खटके उडाले होते . मात्र, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तुकाराम मुंडे यांची  बाजू घेतली होती. विनाकारण अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, असेही त्यांनी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना बजावले होते. असे असले ट्री मुंडेंची बदलीची केली होती . 

तुकाराम मुंडे जिथे गेले तेथे पदाधिकारी आणि पुढाऱ्यांशी त्यांचे पंगे झाले आहेत. काटेकोर नियम पाळत असल्याने त्यांच्याशी कोणाचेच पटत नाही. सत्ताधाऱ्यांना पटापट कामे कारायची घाई असल्याने मुंडे यांच्याशी त्यांचे कधीच पटले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com