Nagpur MLA hostel used for prostitution ! | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

आमदार निवास' देहव्यापाराचा अड्डा?

सरकारनामा न्यूजब्युरो
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

आमदार निवासात अनेक खोल्या असून त्या हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर रिकाम्या राहतात. या रुमचा गैरफायदा काहीजण अनैतिक कामासाठी केला जात असल्याचे या दोन घटनांनी उघडकीस आले आहे. अतिशय कमी दरामध्ये आमदार निवासात रुम उपलब्ध होतात. त्यासाठी आमदार निवासातील कर्मचारी व चौकीदार चांगलीच कमाई करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपींनी केवळ एक हजार रुपये देऊन दिवस रुम बुक केली होती. 

नागपूर: नागपुरातील आमदार निवास देहव्यापाराचा अड्डा झाला काय? असा प्रश्‍न आता नागपुरातील आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरण उघडकीस आल्याने समोर आला आहे. 

नागपुरातील गिट्टीखदान परिसरातील एका 17 वर्षीय मुलीवर चार दिवस दोन युवकांनी सामुहिक बलात्कार केला. ही घटना गेल्या बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी पीबी ज्वेलर्सचे मालक मनोज भगत व रजत मद्रे या आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी चार दिवस आमदार निवासातील रुममध्ये हे कुकृत्य केले. 

ही घटना उघडकीस आल्यानंतर पुन्हा आमदार निवासात काटोलच्या व्यक्तीने युवतीला आणल्याचे उघडकीस आले. त्या संबंधित व्यक्तीच्या पत्नीमुळे हा प्रकार उघडकीस आला. पती दुसऱ्या महिलेसोबत आमदार निवासात आल्याची माहिती त्या व्यक्तीच्या पत्नीला कळली. पत्नीने थेट आमदार निवास गाठले व रुमचा दरवाजा ठोठावला. यावेळी पती व पत्नीमध्ये चांगलेच भांडण झाले. 

आमदार निवासात अनेक खोल्या असून त्या हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर रिकाम्या राहतात. या रुमचा गैरफायदा काहीजण अनैतिक कामासाठी केला जात असल्याचे या दोन घटनांनी उघडकीस आले आहे. अतिशय कमी दरामध्ये आमदार निवासात रुम उपलब्ध होतात. त्यासाठी आमदार निवासातील कर्मचारी व चौकीदार चांगलीच कमाई करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपींनी केवळ एक हजार रुपये देऊन दिवस रुम बुक केली होती. 

आमदार निवासातील रुम आमदारांची शिफारस, सरकारी कर्मचारी किंवा अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलतीच्या दरात मिळू शकते. इतरांना रुम घ्यावयाची असल्यास व्यावसायिक दर आकारला जातो. परंतु आमदार निवासातील कर्मचारी कमी पैसे घेऊन कोणतीही नोंद न करता रुम उपलब्ध करून देत असल्याचे या घटनांनंतर उघडकीस आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख