नागपुरच्या महापौरांना आमदारकीचे वेध 

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने शहरात सहाही जागा जिंकल्या. परंतु यात एकही महिला आमदार नसल्याने महापौर नंदा जिचकार यांनी नेमका हाच धागा पकडत पक्षाकडे येत्या विधानसभा निवडणुकीत संधी देण्याची मागणी केली आहे.
नागपुरच्या महापौरांना आमदारकीचे वेध 

नागपूर- मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने शहरात सहाही जागा जिंकल्या. परंतु यात एकही महिला आमदार नसल्याने महापौर नंदा जिचकार यांनी नेमका हाच धागा पकडत पक्षाकडे येत्या विधानसभा निवडणुकीत संधी देण्याची मागणी केली आहे. 

पक्षाने दिलेल्या महापौरपदाच्या जबाबदारीमुळे महापालिकेच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवून सामान्य जनता आणि पक्षाकरिता भरपूर सकारात्मक कार्य केले. शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख निर्माण करून देण्याकरिता सतत कार्यरत असल्याचे महापौरांनी पक्षाकडे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मागील निवडणुकीमध्ये विदर्भातून एकही महिला उमेदवार नव्हती. हे लक्षात घेऊन योग्य त्या मतदार संघातून उमेदवारी द्यावी, अशी विनंती त्यांनी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे नेमक्‍या कुठल्या मतदार संघातून त्या उत्सुक आहेत, याबाबत काहीही स्पष्ट नाही.

संधी दिल्यास पुढेसुद्धा धोरणात्मक कार्याच्या माध्यमातून सामाजिक विकास व पक्षाला आणखी मजबूत करण्याकरिता आणखी चांगले कार्य करता येईल, अशी पुस्तीही त्यांनी पत्रात जोडली आहे. पुढील निवडणुकीतही विदर्भ पक्षाला भक्कमपणे साथ देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com