एकाकी पडलेल्या उपनगराध्यक्ष नंदा मेहेत्रे यांचा अखेर राजीनामा... - lonely deputy president nanda mehetre finally resigns | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

एकाकी पडलेल्या उपनगराध्यक्ष नंदा मेहेत्रे यांचा अखेर राजीनामा...

गजानन काळुसे 
सोमवार, 7 जून 2021

विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेवर सुद्धा झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येसुद्धा महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची गणितं बदलली. मातृतिर्थ सिंदखेड राजा येथेही पक्षीय बलाबलाचे गणित असे काही फिरले की, At Matrutirtha Sindkhed Raja also, the mathematics of partisanship revolved around something like this ५ वर्षांसाठी उपनगराध्यक्ष झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नंदा मेहेत्रे BJP's Nanda Mehetre या नगरपरिषदेत एकाकी पडल्या आणि त्यांच्याविरोधात १५ नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. 15 corporators filed no-confidence motion पद वाचविण्यासाठी संख्याबळ आपण काहीही केल्या जुळवू शकत नाही, हे लक्षात येताच आज त्यांनी पदाचा राजीनामा दिला. 

उपनगराध्यक्ष नंदा मेहेत्रे यांनी आज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे अविश्वास येण्याअगोदरच राजीनामा सुपूर्द केला आहे. महाविकास आघाडीच्या नगर परिषद मधील नगराध्यक्षांसह ३१ मे रोजी १५ सदस्यांनी अविश्वासाचे पत्र मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे उपनगराध्यक्ष नंदा मेहेत्रे यांच्यावर अविश्वास येणार, हे निश्चित होते. सिंदखेड राजा नगरपालिकेत एकूण १७ नगरसेवक आहेत. त्यांपैकी शिवसेनेचे नगराध्यक्ष लोकनियुक्त आहेत तर नगरसेवकांपैकी शिवसेना ७ , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ८, भारतीय जनता पार्टी १ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे त्याचा प्रभाव सिंदखेड राजा नगरपालिकेवरसुद्धा पडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या उपनगराध्यक्ष नंदा मेहेत्रे यांच्यावर महाविकास आघाडीच्या १५ नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. भारतीय जनता पक्षाकडे नगर परिषदेमध्ये एकच जागा असल्यामुळे संख्याबळ नाही. त्यामुळे उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मागील नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपची युती होती. नगराध्यक्ष पद हे शिवसेनेकडे होते. तर नगर उपाध्यक्ष पद हे ५ वर्षांसाठी भाजपकडे, असा फॉर्म्यूला ठरला होता. 

हेही वाचा : इंधन दरवाढीच्या विरोधात काॅंग्रेस आक्रमक, पटोले, वडेट्टीवार धडकले पेट्रोल पंपवर..

विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेवर सुद्धा झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येसुद्धा महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम म्हणून मातृतिर्थ सिंदखेड राजा नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपनगराध्यक्ष होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळ नसल्यामुळे नंदा मेहेत्रेंनी अविश्‍वास प्रस्तावाला सामोरे न जाता उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख