सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झेडपी सदस्यांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचा फटका विषय समित्यांनाही बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे विषय समित्यांमधून त्यांचे पद रद्द करण्यात आले आहे.
ZP Nagpur
ZP Nagpur

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ४२ वर आली. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, अवंतिका लेकुरवाळे आणि समीर उमप यांनी याचिका दाखल करून सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी काल जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या १५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे आता जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ४२ वर आली आहे. ज्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. ते ओबीसी प्रवर्गातून जानेवारी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आले होते. निवडणूक आयोग या १६ जागांवर पुन्हा निवडणूक घेण्याच्या तयारीत असून, निवडणुकीचा स्वतंत्र कार्यक्रम लवकरच देण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या १६ सदस्यांमध्ये काँग्रेसचे ७ सदस्य आहेत. भाजपचे ४ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. १ सदस्य शेकापचा आहे. 

विषय समित्यांनाही फटका 
सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचा फटका विषय समित्यांनाही बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे विषय समित्यांमधून त्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. यात महिला बाल कल्याण समितीचे ४, कृषी समितीचे ४, पशुसंवर्धन समितीचे २, समाजकल्याण समितीचे ३, शिक्षण समितीचे २, वित्त समितीच्या २ सदस्यांचा समावेश आहे. बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीचेच सदस्यत्व रद्द झाले आहे. 

पंचायत समितीच्या तीन सभापतींसह १५ सदस्यांचे सदस्यपद रद्द 
कळमेश्वर पंचायत समितीचे सभापती श्रावण भिंगारे, रामटेक पंचायत समितीचे सभापती कला ठाकरे, हिंगणा पंचायत समितीचे सभापती बबनराव अव्हाळे यांचा समावेश आहे. अन्य सदस्यांमध्ये कळमेश्वर पं.स.च्या सदस्य मालती वसू, सावनेर पं.स.च्या सदस्य भावना चिखले, ममता मेसरे, गोविंदा ठाकरे, रामटेक पं.स.च्या सदस्य भूमेश्वरी कुंभलकर, भूषण होलगीरे, हिंगणा पंचायत समितीचे सदस्य बबिता आंबेटकर, सुरेश काळबांडे, अंकिता ठाकरे, उमरेड पंचायत समितीतून शालू गिल्लूरकर, सुरेश लेंडे व भिवापूर पंचायत समितीतून नंदा नारनवरे यांचा समावेश आहे. 

सदस्यत्व रद्द झालेले राजकीय पक्षाचे सदस्य 
काँग्रेस 

मनोहर कुंभारे (केळवद) 
ज्योती शिरसकर (वाकोडी) 
अर्चना भोयर (करंभाड) 
योगेश देशमुख (अरोली) 
अवंतिका लेकुरवाळे (वडोदा) 
ज्योती राऊत (गोधनी रेल्वे) 
कैलास राऊत (बोथिया पालोरा) 

राष्ट्रवादी काँग्रेस 
देवका बोडके (सावरगाव) 
पुनम जोध (भिष्णूर सर्कल) 
चंद्रशेखर कोल्हे (पारडसिंगा) 
सुचिता ठाकरे (डिगडोह) 

भाजपा 
अनिल निधान (गुमथळा) 
राजेंद्र हरडे (नीलडोह) 
अर्चना गिरी (डिगडोह-इसासनी) 
भोजराज ठवकर (राजोला) 

शेकाप 
समीर उमप (येनवा) 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com