वणीच्या शिवसैनिकांची आक्रमकता गेली कुठे?, राणेंच्या निषेधाला सैनिकांचीही वानवा..

एरवी जिल्हाप्रमुख विश्‍वास नांदेकर आक्रमक स्वभावाचे आहेत. शिवसेनेचे कुठलेही आंदोलन असो वा मोर्चा. आक्रमकता त्यांच्या देहबोलीतून सदा झळकत असते. त्याच बळावर ते एकदा आमदारसुद्धा झाले.
Sarkarnama
Sarkarnama

नागपूर : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे BJP's Union Minister Narayan Rane यांनी कोकणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे The Chief Minister Uddhav Thackeray यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर राज्यातील शिवसैनिक पेटून उठला. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटताना दिसत असून ठिकठिकाणी आक्रमक आंदोलने होत आहेत, मोर्चे काढले जात आहेत. असे असताना जिल्ह्यातील शिवसेनेचा गढ समजल्या जाणाऱ्या वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात अवघ्या पंधरा ते वीस शिवसैनिकांनी निषेध नोंदविला आणि यावेळी शिवसेनेची आक्रमकता कुठेही बघायला मिळाली नाही, याबद्दल अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

एरवी जिल्हाप्रमुख विश्‍वास नांदेकर आक्रमक स्वभावाचे आहेत. शिवसेनेचे कुठलेही आंदोलन असो वा मोर्चा. आक्रमकता त्यांच्या देहबोलीतून सदा झळकत असते. त्याच बळावर ते एकदा आमदारसुद्धा झाले. पण राज्यभरातील शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलने करून महाराष्ट्र दणाणून सोडला आहे. बऱ्याच ठिकाणी तर भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक आमनेसामनेसुद्धा आले. पण वणीकरांना शिवसेनेची आक्रमकता आज बघायला मिळाली नाही. आता यामागची कारणे जो तो आपआपल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात आर्णी, वणी, दारव्हा व उमरखेड या विधानसभा मतदारसंघांत शिवसेना ही तुल्यबळ होती. २०१४ पासून दारव्हा वगळता अन्यत्र गळती लागल्याचे चित्र आहे. स्थानिक नेत्यांची अकार्यक्षमता चव्हाट्यावर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसोबतच सहकार क्षेत्रात आलेले अपयश हे स्थानिक पुढाऱ्यांचे अपयश समजावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्वीप्रमाणे उत्साह आणि जोश आता शिवसेनेत दिसत नाही, असे बोलले जात आहे. माजी पालकमंत्री संजय राठोड यांनी अनेक अडचणी आल्यानंतरही आपला बालेकिल्ला मजबूत ठेवलेला असताना वणी विधानसभा क्षेत्रात मात्र शिवसेनेला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. 

मागील निवडणुकीत शिवसेनेच्या धुरंधर नेत्यांनी आपले हसे करून घेतले. पक्षाला प्रचंड गळती लागल्याचे तेव्हा बघायला मिळाले. एकछत्री अंमल असल्याच्या आविर्भावात जिल्हाप्रमुख वावरत असल्याचा हा परिपाक असल्याच्या चर्चा आता झडू लागल्या आहेत.  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संपूर्ण राज्यात सत्ता असताना सुद्धा शिवसैनिक खवळले आहेत. मागील दोन वर्षांपासून संयमाची भूमिका घेणारे शिवसैनिक आज संतप्त झाले आहे. मात्र वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात येथील टिळक चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध करण्याकरिता आंदोलन करण्यात आले. यावेळी केवळ पंधरा ते वीस शिवसैनिकांची उपस्थिती अचंबित करणारी होती. यावरून पक्षाचे कार्याध्यक्ष तथा मुख्यमंत्री यांचेबाबत असलेली अस्मिता वणीकर शिवसैनिकांसाठी किती प्रखर आहे, बघायला मिळाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com