‘त्या’ सहा जणांचा मृत्यू जनरेटर संचाच्या धुरामुळे गुदमरून की विषबाधा? 

मेश लष्कर यांची पत्नी दासू हिच्यावर उपचार सुरू आहे. सध्या ती बेशुद्ध अवस्थेत आहे. तिच्या रक्ताचे आणि पोटातील अन्नाचे नमुने सुद्धा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. मृतांचा व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

चंद्रपूर : जनरेटरचा धूर एसीच्या ब्लोअलमधून घरात शिरून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दुर्गापूर Durgapur येथे उघडकीस आली. पण या सहा जणांचा मृत्यू धुराने गुदमरून झाला की त्यांना विषबाधा झाली, याचा तपास सुरू आहे. त्यांचा मृत्यू विषबाधेने झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. those six died due to suffocation of smoke from generator or poisoning.

धुराने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा, यावर प्रत्यक्षदर्शी आणि शेजाऱ्यांचा यावर विश्वास बसत नाहीये. रमेश लष्करे यांचा मृतदेह स्नानगृहात आढळून आला होता. विशेष म्हणजे, या सर्वांनी अंगावरील कपड्यातच शौच केली होती. त्यामुळे हा प्रकार विषबाधेचा असू शकतो, असाही संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल चोवीस तासानंतर मिळेल व त्यातूनच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

मेंदी अजून ओलीच होती... 
लष्करे कुटुंबातील अजयचा विवाह पंधरा दिवसांपूर्वीच कोराडी येथील माधुरीशी झाला होता. दोन्ही कुटुंब आनंदात होती. लष्करे परिवार सोमवारी माधुरीच्या माहेरी कोराडीला जाऊन आले होते. माधुरीच्या हातावरची मेंदीही अजून वाळली नव्हती. ती वाळण्यापूर्वीच नियतीने डाव साधला व या नवविवाहित जोडप्यासह लष्करे कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.

या कुटुंबातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या जोडप्यासह आठ आणि दहा वर्षीय बालकांचा समावेश आहे. दुर्गापुरातील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये ही घटना घडली. अजय लष्करे (वय २१), माधुरी लष्करे (२०), रमेश लष्करे (४५), लखन लष्करे (१०), कृष्णा लष्करे (८) आणि पूजा लष्करे (१४) अशी मृतांची नावे आहे. रमेश लष्करे यांची पत्नी दासू लष्करे हिची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात प्रारंभिक उपचार करून शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 
लष्करे कुटुंब मजूर वर्गातील आहे. बांधकामाचे छोटे-मोठे कंत्राट ते घ्यायचे. मजुरी करायचे. अजयचा मागील २८ जून ला नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील माधुरीशी विवाह झाला. लष्करे कुटुंबीय काल सोमवारी कोराडीला गेले होते. तिथून सायंकाळी घरी परत आले. 

काल रात्री ९ वाजताच्या सुमारास दुर्गापूर परिसरातील वीज खंडित झाली आणि हीच रात्र लष्करे कुटुंबासाठी काळरात्र ठरली. वीज गेल्यानंतर घरातील जनरेटर सुरू करण्यासाठी अजयने डिझेल आणले. तत्पूर्वी या सर्वांनी मिळून जेवण केले. जनरेटरने वीज सुरू केल्यानंतर ते सर्व झोपी गेले. वस्तीत सर्व मजूर वर्ग असल्याने कामावर जाण्यासाठी या परिसरातील लोक पहाटेच उठतात. मात्र लष्कर कुटुंबीयांचा दरवाजा बराच उशिरापर्यंत बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा ठोठावून बघितले. आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर खिडक्या उघडून बघितले तेव्हा आता सर्वत्र काळा धूर पसरलेला दिसला. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आता प्रवेश केला आणि काळजाचा थरकाप उडणारे दृश्य बघून सारेच हादरले. 

बेशुद्धावस्थेतील सातही जणांना चंद्रपुरातील डॉ. विश्वास झाडे यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सात पैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. रमेश लष्कर यांची पत्नी दासू हिच्यावर उपचार सुरू आहे. सध्या ती बेशुद्ध अवस्थेत आहे. तिच्या रक्ताचे आणि पोटातील अन्नाचे नमुने सुद्धा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. मृतांचा व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. दुपारी दोन नंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली होती. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com