गरमीपासून बचाव बेतला जिवावर, जनरेटरच्या धुराने घेतला एकाच कुटुंबातील ६ जणांचा बळी...

लष्कर यांच्या घरातून धूर निघत असल्याचे दिसताच परिसरातील लोकांनी आरडाओरडा करीत पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी लष्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील सदस्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नागपूर : चंद्रपुरातील दुर्गापूर हा भाग मागास आहे. येथील लोकांना वीज पुरवठा अभावानेच होतो आणि चंद्रपुरातील गरमी जीवघेणी असते. काल रात्री वीज गेल्याने लष्कर कुटुंबातील सदस्यांनी जनरेटर सुरू केला आणि एसी लावून झोपले. मध्यरात्रीपर्यंत जनरेटरचा धूर सर्वत्र पसरला आणि एसीमधून धूर घरात शिरला. कुटुंबातील सहाही सदस्यांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला. The smoke from the generator killed six members of the same family.

वीज नसल्यामुळे एसी चालवण्यासाठी लावलेल्या जनरेटरमधून झालेल्या कार्बनडाय ऑक्साइडच्या गळतीने गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूरमधील दुर्गापूर भागात घडली. बहुतांश झोपडपट्टी असलेला हा भाग अजूनही मागास असून येथे वीज अभावानेच येते. त्यामुळे अनेक कुटुंब जनरेटरचा वापर करतात. चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्या कुटुंबानेही रात्री वीज नसल्याने जनरेटरवर सुरू करून एसी लावला होता.

सध्या पावसाने दडी मारल्याने पूर्व विदर्भात असह्य उकाडा आणि गरमी आहे. त्यातच वीज नसली की, अंगातून घामाच्या धारा वाहतात. या गरमीपासून वाचण्यासाठी रमेश लष्कर यांनी १२ जुलैच्या रात्री जनरेटरवर एसी लावला. जनरेटरचा धूर प्रचंड प्रमाणात पसरला. घराचे दरवाजे व खिडक्या बंद असल्याने जनरेटरमधून निघालेला धूर एसीमध्ये गेला आणि ब्लोरअमधून घरभर पसरल्याने लष्कर यांच्या कुटुंबातील सहा जणांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला. तर एक जणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

लष्कर यांच्या घरातून धूर निघत असल्याचे दिसताच परिसरातील लोकांनी आरडाओरडा करीत पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी लष्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील सदस्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून सहा जणांना मृत घोषित केले. मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. त्यानंतर ही दुदैवी घटना झाल्याने दुर्गापुरात शोककळा पसरली आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com