गाडीसमोर झोपला, तरीही आमदार राठोडांनी केली नाही ‘त्याची’ मागणी पूर्ण... - slept in front of the car but mla rathore did not fulfill his demand | Politics Marathi News - Sarkarnama

गाडीसमोर झोपला, तरीही आमदार राठोडांनी केली नाही ‘त्याची’ मागणी पूर्ण...

रामदार पद्मावार
शनिवार, 20 मार्च 2021

आठवड्यातील दर शुक्रवारी आमदार राठोड हे दिग्रस शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिग्रसच्या विश्रामगृहात जात असतात. याठिकाणी शहरातील वैभव नगरातील भास्कर वाघमारे नामक एक विकलांग आला होता. बराच वेळ होऊनही भास्कर वाघमारेंची आमदार संजय राठोड यांच्यासोबत भेट झाली नाही.

दिग्रस (जि. यवतमाळ) : माजी वनमंत्री व आमदार संजय राठोड हे नियमितपणे दिग्रस येथे जनता दरबार घेतात. कालही ते यासाठीच दिग्रसला गेले होते. तेथे एका विकलांग व्यक्तीची त्यांच्यासोबत शेवटपर्यंत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी तो चक्क त्यांच्या गाडीसमोरच झोपला. त्यानंतर आपली मागणी पूर्ण होईल, अशा आशा त्याला होती. आमदार राठोडांनी त्याला आश्‍वासन दिले, मात्र त्याची मागणी पूर्ण केलीच नाही. 

एका विकलांग युवकाची संजय राठोड यांच्यासोबत भेट शक्य झाली नाही. त्यामुळे व्यथित झालेल्या त्या युवकाने काल दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास आमदार संजय राठोड यांची गाडी येत असताना चक्क रस्त्यावर झोपून त्यांचा रस्ता अडविला. यामुळे एकच गोंधळ उडाला. अपंग भास्कर वाघमारे गाडीपुढे झोपताच तेथे बघ्यांची गर्दी झाली. त्यानंतर पोलिसांनी वाघमारे यांना उठवून आमदार राठोड यांच्याकडे नेले. यावेळी वाघमारेंनी एकवेळ आपल्या वार्डात भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली. यावेळी आमदार राठोड यांनी थोड्या वेळात येतो, असे आश्‍वासन दिले. मात्र नंतर ते शहरातील लोकार्पण सोहळ्यास निघून गेले. 

आठवड्यातील दर शुक्रवारी आमदार राठोड हे दिग्रस शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिग्रसच्या विश्रामगृहात जात असतात. याठिकाणी शहरातील वैभव नगरातील भास्कर वाघमारे नामक एक विकलांग आला होता. बराच वेळ होऊनही भास्कर वाघमारेंची आमदार संजय राठोड यांच्यासोबत भेट झाली नाही. त्यामुळे आमदार राठोड यांची गाडी विश्रामगृहातून बाहेरच्या दिशेने निघाली असता त्या दिव्यांगाने चक्क रस्त्यावर झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी अडविली. वाघमारे गाडीपुढे झोपताच तेथे बघ्यांची गर्दी झाली.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख