भूकंपाचे धक्के नाही जाणवले, पण बोअरमधून येतेय उकळते पाणी…

ज्या गावात बोअरमधून उकळते पाणी येत आहे. त्या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत आणि हानीही झालेली नाही. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 4.4 एवढी नोंदवली आहे. केंद्रबिंदूच्या ठिकाणी शेती भूभाग आहे, मात्र आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

महागाव (जि. यवतमाळ) : दोन दिवसांपूर्वी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या Nanded and Hingoli District काही भागांत भूकंपाचे Earthquake सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील साधूनगर होते. Sadhunagar of Mahagaon Tahsil या परिसरात मात्र भूकंपाचे धक्के जाणवले नाही. मात्र त्यानंतर महागावनजिकच्या आंबोडा Amboda येथे बोअरमधून उकळते पाणी यायला लागले आहे. Boiling water coming from the bore त्या भूकंपाचा हा परिणाम असावा, असा अंदाज गावकरी लावत आहेत. 

आंबोडा येथील सेवानिवृत्त शिपाई माधव भोयर यांच्या घरी असलेल्या विंधन विहिरीतून अचानक गरम पाणी येऊ लागले आहे. बोअरच्या मोटरमध्ये काही बिघाड झाला असावा, म्हणून त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. त्यानंतर मोटरही दुरुस्त करवून घेतली. त्यानंतर आजही गरम पाणी येत असल्याने त्यांना काळजी वाटली. ही माहिती गावात पसरताच लोकांनी बोअरमधून येणारे उकळते पाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. काहींनी भिती तर काहींनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

याबाबत गावकरी म्हणाले,  नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतरच हा प्रकार सुरू झाला आहे. दिवसागणिक पाण्याचे तापमान वाढू लागले आहे. त्यामुळे आमच्यात भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली पाहिजे. याबाबत माजी उपसरपंच हनवंतराव देशमुख यांनी सुरू असलेल्या नैसर्गिक किमयेची माहिती तहसीलदार नामदेव इसलकर यांना देण्यासाठी दूरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील विविध भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र महागाव तालुक्यातील साधुनगर असल्याचे आणि रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी नोंदवण्यात आली होती. भूकंपाचे केंद्र असलेल्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत. मात्र भोयर यांच्या घरी असलेल्या विंधन विहिरीतून (बोअर) उकळते पाणी येत असल्याने हा भूकंपाचा परिणाम तर नाही ना, अशी शंका गावकऱ्यांना आहे. 

ज्या गावात बोअरमधून उकळते पाणी येत आहे. त्या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत आणि हानीही झालेली नाही. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 4.4 एवढी नोंदवली आहे. केंद्रबिंदूच्या ठिकाणी शेती भूभाग आहे, मात्र आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

यापूर्वी सन २०१९ मध्येही यवतमाळ व नांदेड जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. त्यावेळी भयभीत होऊन नागरिकांना घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी सहारा घेतला होता. तेव्हाही जीव हानी झाली नव्हती पण घरांचे मात्र नुकसान झाले होते. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, अर्धापूर आणि तरोडा बुद्रूक या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रिश्‍टर स्केलवर या भूकंपाची नोंद होताच प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 
Edited By : Atul Mehere 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com