हिंदू स्मशान संस्थेत तिसरी दाहिनी लावण्यास परिसर बचाव समितीचा विरोध...

माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी देखील परिसर बचाव कृती समितीच्या भूमिकेला सहमती दर्शवली असून तिसरी वाहिनी शहरातील दुसऱ्या भागात लावण्यात यावी, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे केली आहे.
Amravati Muktidham
Amravati Muktidham

नागपूर : कोविड काळात अमरावतीच्या मध्यवस्तीत वसलेल्या हिंदू स्मशान संस्थेवर येणारा अंत्यसंस्कारांचा ताण शहरात असलेल्या विविध स्मशानांकडे वळता करून By the stress of the funeral turning to the various cemeteries in the city या परिसरातील लोकांना होणारा असह्य त्रास कमी करावा. या स्मशानावरचा वाढलेला ताण पाहता तिसरी गॅस किंवा विद्युत दाहिनी शहरातील इतर कुठल्या स्मशानात लावून दुसरेही स्मशान विकसित करावे, Another cemetery should be developedअशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व परिसर बचाव कृती समितीचे प्रमुख शिवराय कुळकर्णी Shivray Kulkarni यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे District Collector केली आहे. 

परिसर बचाव समितीने पत्रकार परिषद घेऊन तिसऱ्या दाहिनीला आपला कडाडून विरोध दर्शविला. संपूर्ण जिल्ह्यातून किंवा जिल्ह्याबाहेरूनही उपचारार्थ अमरावतीत आलेल्या कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांचे पार्थिव अमरावतीच्या हिंदू स्मशान संस्थेत अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. गेल्या २ महिन्यात या स्मशानात अभूतपूर्व गर्दी आहे. या स्मशानात सर्व सोयी उपलब्ध असल्याने सर्वच मृतांच्या नातेवाइकांचा याच स्मशानात अंत्यसंस्कार करण्याकडे कल असतो. या स्मशानात दोन गॅस दाहिन्या आहेत. आता तिसरी दाहिनी लावली जाणार आहे. स्मशान ही अत्यावश्यक सेवा आहे पण शहराचा वाढता व्याप लक्षात घेता एकच स्मशान विकसित करणे, सोयीचे नाही. शहराच्या विविध भागांतील स्मशाने देखील विकसित झाली पाहिजे, असे परिसर बचाव समितीचे म्हणणे आहे.  

स्मशानाचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेचा उद्देश सेवाभावी आहे, यात शंका नाही. मात्र, त्यांच्याही क्षमतेच्या मर्यादा आता स्पष्ट झाल्या आहेत. स्मशानाला देणगी देणाऱ्या लोकांचा हेतू देखील उदात्त आहे. मात्र, आता हे स्मशान गावाबाहेर राहिलेले नाही. चारही बाजूंनी प्रचंड लोकवस्ती झाली आहे. कोविड प्रेताला पीपीई किट्ससह जाळले जाते. त्याचा दुर्गंध परिसरात पसरतो. अवती भोवती असलेल्या सर्व कॉलनीतल्या घरांवर गॅसदाहिनीची राख भुरभुर उडून येते. मृताच्या नातेवाइकांनी वापरलेल्या पीपीई किट्स, मास्क व कपडे नष्ट करण्याला शिस्त नसल्याने संपूर्ण परिसर खराब झाला आहे. या परिसरातील प्रदूषणाची पातळी धोकादायकरीत्या वाढली आहे. मृतांना स्वर्ग मिळण्याची व्यवस्था केली जात असताना जिवंत लोकांच्या वाट्याला नर्कयातना येणार नाहीत, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. लोकभावना लक्षात न घेता त्यांच्यावर मूठभर लोक आपला अट्टहास व आग्रह लादत असल्याचे या प्रकरणी स्पष्ट असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

या स्मशानावर येणारा ताण कमी करण्यासाठी शहरातील विविध स्मशानांमध्ये जिल्हा प्रशासनाने तात्काळ सोयी उभ्या केल्या पाहिजे. दिवस रात्र याच स्मशानातील गॅसदाहिनी चालू ठेवण्यापेक्षा शहराच्या विविध भागांत असलेल्या स्मशानांमध्ये गॅसदाहिनी लावून ताण कमी केला जाऊ शकतो. जेणेकरून कोरोनाकाळ संपल्यावर देखील विविध भागांत अंत्यसंस्काराच्या व्यवस्था राहतील. जिल्हा प्रशासनाने हिंदू स्मशान संस्थेचीच मदत व मार्गदर्शन घेऊन बडनेरासह शहरातील इतरही स्मशानांचे अद्ययावतीकरण करावे, अशी मागणी कुळकर्णी यांनी केली आहे.

तिसरी दाहिनी लावली जाणार, हे वृत्त कळताच या परिसरातील संतप्त लोक काल पुन्हा स्मशान परिसरात एकत्र झाले होते. त्यांच्या भावना तीव्र होत्या. लोकांनी स्वतः भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांना स्मशानात बोलवून तिथली परिस्थिती दर्शवली. गॅस दाहिनीची राख त्यांच्या स्वयंपाक घरापर्यंत उडत जाते. लोक अतिशय त्रस्त आहेत. संपूर्ण परिसर प्रदूषणाने व्यापला आहे. परिसरातील लोकांच्या समस्येचे निराकरण न झाल्यास लोक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अमरावती महानगरपालिकेने देखील तिसरी दाहिनी लावू नये, असा ठराव आमसभेत एकमताने केला आहे. अमरावती मनपा आमसभेचा प्रस्तावाकडेदेखील हिंदू स्मशान संस्थेने दुर्लक्षित करू नये. 

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना देखील परिसरातील लोक जाऊन भेटले. शहरातील इतर स्मशानेदेखील विकसित करावी, हीच भूमिका प्रभाकरराव वैद्य यांनी बोलून दाखवली. या संदर्भात ते देखील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी देखील परिसर बचाव कृती समितीच्या भूमिकेला सहमती दर्शवली असून तिसरी वाहिनी शहरातील दुसऱ्या भागात लावण्यात यावी, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे केली आहे.

यावेळी परिसर बचाव कृती समितीचे डॉ. दीपक पोच्छी, विशाल कुळकर्णी, जितेंद्र कुरवाणे, किशोर सावळे, रवी लोडम, आशिष जगनाडे, पुंडलीक दुरणे, अरविंद गंगेले, चंद्रशेखर कुळकर्णी, अभय बपोरीकर, श्याम जोशी, नगरसेवक स्वाती कुलकर्णी, लविना हर्षे, अजय सारसकर, प्रणीत सोनी आणि जितेंद्र कुरवाणे प्रामुख्याने उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com