खुद्द पवारांनी पाहिले होते शेतीचे नुकसान, तरीही वर्षभरानंतर मिळाली भरपाई… - pawar himself had seen the loss of agriculture he got compensation after year | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

खुद्द पवारांनी पाहिले होते शेतीचे नुकसान, तरीही वर्षभरानंतर मिळाली भरपाई…

सरकारनामा ब्यूरो 
बुधवार, 10 मार्च 2021

संबंधित तलाठ्याने मुनी यांना उद्धट उत्तरे देऊन परत पाठवले. शेतातील कापूस, सोयाबिन, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. शरद पवार दौऱ्यावर आले असताना नरखेड तालुक्यातील नुकसान त्यांना दाखवण्यासाठी सुदाम मुनी यांच्या शेताची निवड करण्यात आली होती.

नागपूर : २०१९ हे वर्ष सरत असताना परतीच्या पावसाने शेतीपिकांना चांगलाच दणका दिला. पिकांचे अतोनात नुकसान केले. शेतकरी हवालदिल झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी नागपूर जिल्ह्यातील शेतांमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती. त्यावेळी राजेंद्र धावडे उर्फ सुदाम मुनी यांच्या शेतात त्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर पवार येथून गेल्यानंतर जानेवारी २०२० मध्ये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांनी मिळणे सुरू झाले. त्या वर्षभरात मुनी यांना भरपाई मिळाली नाही, ती १ मार्च २०२१ ला ७ हजार रुपये मिळाले. पण २०१७-१८ ची नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याचा आरोप शेतकरी सुदाम मुनी यांनी केला आहे.

२०१७-१८ मध्ये झालेल्या नुकसानासाठी १० हजार रुपये मिळायला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. मुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकसान भरपाई वाटपामध्ये कमीत कमी ९०० रुपये ते १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली. राज्यपालांनी या मदतीची घोषणा केली होती. काटोल ते जलालखेडा मार्गावर बुधागड थांब्यापासून जवळच असलेल्या शेतात शरद पवार यांनी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख आणि डझनभर नेते व अधिकारी होते. खुद्द पवारांनी नुकसानाची पाहणी केल्यानंतर तत्काळ नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा होती. पण ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’, या उक्तीप्रमाणे सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुनी यांना वर्षभर ताटकळत ठेवले. २०१७-१८ ची नुकसान भरपाई का दिली नाही, याचे समाधानकारक उत्तर आजही शासकीय कर्मचाऱ्यांनी दिले नाही. 

संबंधित तलाठ्याने मुनी यांना उद्धट उत्तरे देऊन परत पाठवले. शेतातील कापूस, सोयाबिन, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. शरद पवार दौऱ्यावर आले असताना नरखेड तालुक्यातील नुकसान त्यांना दाखवण्यासाठी सुदाम मुनी यांच्या शेताची निवड करण्यात आली होती. त्यानुसार पवारांचा ताफा तेथे पोहोचला. झालेल्या नुकसानाची पाहणी केली आणि तहसीलदारांना पंचनामा करण्याचे आदेश देऊन ताफा निघून गेला. त्यानंतर मुनी यांना मदत मिळण्यासाठी १ वर्षाचा कालावधी लागला. नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेसाठी बैठकांवर बैठका सुरू होत्या. तशाही स्थितीत शरद पवारांनी बैठका सोडून परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विदर्भाकडे कूच केली होती. शेतकऱ्यांच्या अडचणीला त्यांनी येवढे महत्व दिले होते. पण शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मात्र शेतकऱ्यांच्या अडचणींशी काही देणेघेणे नसल्याचे गेल्या वर्षभरातील त्यांच्या वर्तनावरून लक्षात येते, असे सुदाम मुनी म्हणाले.

हेही वाचा : 'त्या' चौघांची राजकारणाची सवारी - रिक्षाचे स्टेअरिंग ते लोकप्रतिनिधी

'राजेंद्र धावडे उर्फ सुदाम मुनी हे शेतकरी मुनी आहेत. ते नेहमी फिरत राहतात. त्यांच्या बॅंक खात्याच्या संदर्भात घोळ झाला होता. त्यामुळे त्यांच्या खात्यात २०१९-२० ची नुकसान भरपाईची रक्कम टाकायला बिलंब झाला. २०१७-१८ च्या नुकसान भरपाईसंदर्भातही तसेच झाले असावे आणि ती रक्कम परत गेली असावी. त्याची माहिती घेऊन कार्यवाही करू. 
- श्री जाधव, तहसीलदार, नरखेड. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख