चंद्रपुरच्या महापौरांनी घेतले चार एक्के, अन् रुग्णवाहिकेला दे धक्के... - the meyour of chandrapur took four ekke and toeing the ambulance | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

चंद्रपुरच्या महापौरांनी घेतले चार एक्के, अन् रुग्णवाहिकेला दे धक्के...

प्रमोद काकडे 
बुधवार, 21 जुलै 2021

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटीलेटरयुक्त रुग्णवाहिकेची आवश्‍यकता असताना पैसै नाही म्हणून तो प्रस्ताव धुळखात ठेवला गेला. पण त्याचवेळी केवळ चमकोगिरी करण्यासाठी २४ लाख रुपयांचे प्रसिद्धीचे कंत्राट दिले गेले.

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकेतील इंधन संपल्यामुळे तिला टोचन करून नेण्यात आले. अन् ज्या वाहनाने रुग्णवाहिकेला ओढून नेले, ते महापालिकेच्याच कुत्रे पकडणाऱ्या वाहनाने. हे चित्र चंद्रपूरवासीयांनी पाहिले. निधीची चणचण असल्यामुळे रुग्णवाहिकेत इंधन भरायला पैसे नाहीत. पण महापौरांनी मात्र नवे वाहन खरेदी केले अन् प्रथम नागरिक असल्याने त्या वाहनाला व्हीव्हीआयपी नंबर (११११) घेतला. त्यामुळे ‘महापौरांनी घेतले ४ एक्के, अन् रुग्णवाहिकेला दे धक्के’, असे म्हणत चंद्रपूरकर महानगरपालिका आणि महापौरांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. Chandrapurkar is seen mocking the municipal corporation and the meyor. 

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटीलेटरयुक्त रुग्णवाहिकेची आवश्‍यकता असताना पैसै नाही म्हणून तो प्रस्ताव धुळखात ठेवला गेला. पण त्याचवेळी केवळ चमकोगिरी करण्यासाठी २४ लाख रुपयांचे प्रसिद्धीचे कंत्राट दिले गेले. पण महानगरपालिकेचे सत्ताधारी येवढ्यावरच थांबले नाहीत, तर निधीची चणचण असतानाही महापौरांनी नवे वाहन घेतले आणि प्रथम क्रमांकाची नागरिक असल्यामुळे वाहनाचा क्रमांकही एक नंबरी घेतला. वाहनासाठी ४ एक्के असलेला (११११) नंबर घेण्यासाठी महापालिकेला तब्बल ७० हजार रुपयांचा चुना लावला. महापौरांनी आपल्या वाहनासाठी ४ एक्के घेतले आणि रुग्णवाहिकेला मात्र दे धक्के करण्याची वेळ आली. 

महापौर व आयुक्तांच्या सेवेत होंडा सीटी या कार होत्या. मात्र आयुक्त राजेश मोहिते यांनी फेब्रुवारी महिन्यात अल्फा नेक्सा कंपनीचे एक्सएल ६ हे नवीन वाहन खरेदी केले. त्यासाठी ११ लाखांपेक्षा जास्त पैसे खर्च केले. यानंतर या वाहनाच्या अतिविशीष्ट नंबरसाठी (एमएच ३४ बीव्ही ११११) ७० हजार रुपये पुन्हा खर्च केले. केंद्र व राज्य सरकारने कोरोना काळात केवळ कोरोना उपचारांवर निधी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतरही महापालिकेने अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी केली. 

हेही वाचा : ‘महापालिका आयुक्त साहेब खड्डा’, नगरमधील खड्ड्यांचे नामकरण

विशेष म्हणजे, शासकीय वाहनासाठी अतिविशिष्ट क्रमांक मिळावा म्हणून अशा प्रकारे शासकीय निधी खर्च करणे अयोग्य आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत संबंधित लिपिकाने महापालिकेच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मात्र, काही पदाधिकाऱ्यांचा अतिविशिष्ट क्रमांकासाठी आग्रह असल्यामुळेच हा निधी खर्च केला गेल्याची माहिती आहे. दरम्यान, आयुक्त राजेश मोहिते यांनी पदाचा दुरुपयोग करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. तेव्हा त्यांच्यावर उधळपट्टीचा ठपका ठेवून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख