12 हजार साईभक्तांचे सदस्यत्व रद्द : सहधर्मदाय आयुक्तांचा निर्णय

उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
Saibaba
Saibaba

नागपूर : वर्धा रोडवरील साईबाबा सेवा मंडळाच्या (Saibaba Seva Mandal) तब्बल ११ हजार ७३६ साईभक्तांचे सदस्यत्व सह धर्मदाय आयुक्त आभा कोल्हे यांनी एका झटक्यात रद्द केले आहे. त्यामुळे साई भक्त चांगलेच भडकले असून या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे.

पाच वर्षांपूर्वी साईबाबा सेवा मंडळाची निवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली होती. भक्तांनी रांगेत उभे राहून आपल्या नावाची रितसर नोंदणी केली होती. प्रत्येकी हजार रुपये शुल्कही भरले होते. सेवा मंडळाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. हा वाद उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात पोहचला होता. सर्वोच्च न्यायालयाने ज्यांच्या नावावर आक्षेप असेल त्याची सुनावणी करून प्रकरण निकाली काढण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांना दिले होते. सोबतच त्यावेळची निवडणूक सोडून पुढील निवडणुकीसाठी सर्व सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याचेही निर्देश दिले होते.

त्यानुसार तत्कालीन सह धर्मदाय आयुक्त मते यांनी रितसर सर्व प्रक्रिया करून ११ हजार ७३६ भक्तांची नोंदणी वैध करून घेतली होती. मात्र विद्यमान सह धर्मदाय आयुक्त आभा कोल्हे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, माजी आयुक्तांच्या निर्णयाकडे साफ दुर्लक्ष करून सरसकट सर्वांची नोंदणी अवैध ठरवली आहे. सदस्यत्व रद्द करण्यापूर्वी संबंधित सदस्यांना नोटीस पाठवली नाही, त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले नाही, तसेच कुठल्या कारणामुळे सदस्यत्व रद्द केले याची माहितीसुद्धा दिली नाही, असा दावा करण्यात आला आहे. 

घोटाळे बाहेर येण्याची भीती
साईबाबा सेवा मंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीला पराभवाची आणि त्यानंतर आपले घोटाळे चव्हाट्‍यावर येतील, अशी भीती वाटत आहे. त्यामुळे सातत्याने नव्या सदस्य नोंदणी व त्यांच्या मतदानाच्या अधिकाराला विरोध केला जात असल्याचा दावा जय जवान जय किसान संघटननेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com