माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या समाधीवर कोसळली वीज - lightning strikes former chief minister vasantrao naiks tomb | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या समाधीवर कोसळली वीज

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

समाधी स्थळावर पडलेल्या विजेमुळे मोठे नुकसान झाले असून लोकप्रतिनिधींनी समाधिस्थळाची पाहणी करून समाधिस्थळ पूर्वी सारखेच करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वसंतराव नाईक यांचे नातू भाजपचे आमदार निलय नाईक यांच्यासह तहसीलदार पुसद यांनी केली समाधी स्थळाची पाहणी केली.

नागपूर : काल मध्यरात्रीनंतर यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांत अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. अनेक  ठिकाणी वीज कोसळली. गहुली येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या समाधिस्थळावरील घुमटावर वीज कोसळली. यामुळे समाधिस्थळाचे मोठे नुकसान झाले.  

वसंतराव नाईक यांच्या समाधिस्थळाजवळ राजुसिंग नाईक यांचीही समाधी आहे. या समाधीस्थळाचेही वीज पडल्याने नुकसान झाले. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्हयात विजेसह अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज वर्तविला होता. हवामान खात्याने लावलेला तो अंदाज पुसद तालुक्यात बरोबर लागू झाला आहे. तालुक्यात १८ मार्च रोजी दिवसभर उन्हाचे चटके लागत होते. मात्र रात्र होताच होता थंडी पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रात्री १ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. गहुली गावात रात्री पावसासह विजेचा कडकडाट ग्रामस्थांनी अनुभवला आहे. गहुली येथील वसंतराव नाईक व राजुसींग नाईक यांची समाधी असून अचानक पावसासह समाधी स्थळाच्या घुमटावर रात्री १ वाजताच्या दरम्यान वीज कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा : येवढंच सांगा की, तुम्ही हा खर्च खिशातून केलात की सरकारी तिजोरीतून ?

विजेमुळे समाधिस्थळाचे मोठे नुकसान झाले. ही बाब सर्वात पहिले नाईक यांच्या शेतात काम करणारे त्यांचे कामगार विनोद ढगे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी गावातील पंचायत समिती सदस्यांचे पती रूपेश जाधव यांना ओंकार राठोड यांनी फोन करून माहिती दिली. समाधी स्थळावर पडलेल्या विजेमुळे मोठे नुकसान झाले असून लोकप्रतिनिधींनी समाधिस्थळाची पाहणी करून समाधिस्थळ पूर्वी सारखेच करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वसंतराव नाईक यांचे नातू भाजपचे आमदार निलय नाईक यांच्यासह तहसीलदार पुसद यांनी केली समाधी स्थळाची पाहणी केली.

पुसद तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात अवकाळी पावसाने मध्यरात्रीनंतर धुमाकूळ घातला. तालुक्यात अवकाळी पावसासह वीज कोसळयाच्या घटना घडल्या. तालुक्यातील गहुली येथील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक व राजुसिंग नाईक यांच्या समाधी स्थळावरील घुमटावर अचानक वीज कोसळल्याने मोठे नुकसान झाले. बांधकाम केलेल्या अनेक भागांना तडे गेले आहेत. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख