तिसरी दाहिनी ‘स्टँड बाय’ ठेवू पण लावू तिथेच, जिल्हा प्रशासनाचा हेकेखोरपणा...

हिंदू स्मशान संस्थेने आजवर केलेले कार्य प्रशंसनीय आहे. मात्र, स्मशानाची तोकडी जागा, आजूबाजूला असलेली घनदाट वस्ती आणि अरुंद रस्ते अशा असंख्य मर्यादा लक्षात न घेता तिसरी दाहिनी लादली जाते आहे. मृतांची स्वर्गाची व्यवस्था उत्तम करताना जीवित लोकांना नर्कयातना देण्याचे कार्य केले जाऊ नये
Amravati Muktidham
Amravati Muktidham

नागपूर : लक्षावधी रुपये खर्चून येणारी तिसरी गॅस दाहिनी ‘स्टँडबाय’ ठेवू, वापरात नाही आणू पण लोकांचा विरोध असतानाही तुमच्या नाकावर टिचून याच हिंदू स्मशानात लावू, Let's put it on your nose and put it in this Hindu cemetery असा हेकेखोर व अडेलतट्टू कारभार अमरावतीची हिंदू स्मशान संस्था व जिल्हा प्रशासनाने Hindu crematorium of Amravati and district administration चालवला असल्याचा आरोप परिसर बचाव कृती समितीचे प्रमुख आणि भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी BJP state spokesperson Shivrai Kulkarni यांनी आज केला. स्मशानासमोर मूक आंदोलन करून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या या कृतीचा निषेध केला. 

हिंदू स्मशान संस्थेच्या प्रवेशद्वारावर आज शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात परिसर बचाव कृती समितीने मूक आंदोलन केले. नगरसेवक स्वाती कुळकर्णी, अजय सारसकर, लविना हर्षे, प्रणीत सोनी यात प्रामुख्याने उपस्थित होते. कोविड काळात अमरावतीच्या मध्यवस्तीत वसलेल्या हिंदू स्मशान संस्थेवर येणारा अंत्यसंस्कारांचा ताण शहरात असलेल्या विविध स्मशानांकडे वळता करून या परिसरातील लोकांना होणारा असह्य त्रास कमी करावा, या स्मशानावरचा वाढलेला ताण पाहता तिसरी गॅस किंवा विद्युत दाहिनी शहरातील इतर कुठल्या स्मशानात लावून दुसरेही स्मशान विकसित करावे, अशी परिसर बचाव कृती समितीची मागणी आहे. 

आता हिंदू स्मशान संस्थेने व जिल्हा प्रशासनाने हेकेखोर भूमिका घेतली आहे. लोकांचा विरोध आहे म्हणून दोनच दाहिन्या चालवू आणि एक अडीअडचणीच्या वेळी कामी यावी, म्हणून नुसतीच उभी करून ठेवू, अशी भूमिका जाहीर केली जात आहे. लक्षावधी रुपयांचा खर्च करून आणलेली गॅस दाहिनी शोभेचा पांढरा हत्ती बनवून उभी ठेवण्यापेक्षा तिचा इतर स्मशानात वापर का करू नये, याचे उत्तर हिंदू स्मशान संस्था व जिल्हा प्रशासन द्यायला तयार नाही. उलट गावातील दुसरे एखादे स्मशान हिंदू स्मशान संस्थेच्या ताब्यात देऊन ते देखील विकसित करण्यात यावे, ही शहराची मागणी असताना त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याची भावना, या स्मशान परिसरात व्यक्त केली जात आहे. 

हिंदू स्मशान संस्थेने आजवर केलेले कार्य प्रशंसनीय आहे. मात्र, स्मशानाची तोकडी जागा, आजूबाजूला असलेली घनदाट वस्ती आणि अरुंद रस्ते अशा असंख्य मर्यादा लक्षात न घेता तिसरी दाहिनी लादली जाते आहे. मृतांची स्वर्गाची व्यवस्था उत्तम करताना जीवित लोकांना नर्कयातना देण्याचे कार्य केले जाऊ नये, अशी परिसर बचाव समितीची मागणी आहे. आज हाती निषेधाचे फलक घेऊन भर उन्हात मूक आंदोलन करण्यात आले. यात डॉ. दीपक पोच्छी, विशाल कुळकर्णी, जितेंद्र कुरवाणे, किशोर सावळे, रवी लोडम, आशिष जगनाडे, पुंडलिक दुरणे, अरविंद गंगेले,चंद्रशेखर कुळकर्णी, अभय बपोरीकर, श्याम जोशी, आणि जितेंद्र कुरवाणे प्रामुख्याने उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com