क्रांती धोटे झाल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस, तर जिल्हाध्यक्षपदी प्रा. सारीका ताजने - kranti dhote is become ncp state general secretary and sarika tajne is now district chief | Politics Marathi News - Sarkarnama

क्रांती धोटे झाल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस, तर जिल्हाध्यक्षपदी प्रा. सारीका ताजने

चेतन देशमुख
शनिवार, 13 मार्च 2021

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. क्रांती धोटे यांनी काल शुक्रवारी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. सारिका ताजणे ह्या माजी आमदार नानासाहेब ताजणे यांच्या स्नुषा आहेत. सारिका ताजणे उच्चशिक्षित असून, गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत.

यवतमाळ : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी दिग्रस विधानसभेचे माजी आमदार नानासाहेब ताजने यांची स्नुषा प्रा. सारिका ताजणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. 

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होत्या. जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष यवतमाळात आले होते. त्यावेळी त्यांना संघटनेतील कमकुवतपणा दिसला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त करीत पदाधिकार्‍यांची झाडाझडती घेतली होती. त्यांनतर काही दिवसात माजी आमदार ख्वाजा बेग यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आर्णी मधील काही पदाधिकार्‍यांनी राजीनामा अस्त्र उगारले होते. मात्र, प्रदेशाध्यक्षांवर त्यांचा काही परिणाम झाला नाही. काही दिवसापुर्वीच बेग यांचा राजीनामा मंजूर झाला. 

त्यानंतर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. क्रांती धोटे यांनी काल शुक्रवारी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. सारिका ताजणे ह्या माजी आमदार नानासाहेब ताजणे यांच्या स्नुषा आहेत. सारिका ताजणे उच्चशिक्षित असून, गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत.

हेही वाचा : संजय राठोड यांचे पुनर्वसन येत्या काही दिवसांत होणार ?

तळागळात त्यांचा दांडगा संपर्क आहे. क्रांती धोटे यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुका पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात पक्षसंघटन बळकट करण्याचे काम सुरु केले आहे. काही महिन्यांआधी विद्यार्थी काँग्रेस सेलचा जिल्हाध्यक्षही बदलविण्यात आला आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख