कारागृहातून बाहेर आला, फटाके फोडले, अन् पुन्हा लगेच झाले गुन्हे दाखल...

अटक केलेल्या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर कारागृहात रवानगी केली. या गुन्ह्यात कारागृहात शाज अहेमद नजीर अहेमद हा सुद्घा होता. दरम्यान या गुन्ह्यांमध्ये १६ जुलै २०२१ रोजी त्याची जामिनावर सुटला झाली.
Firecrackers
Firecrackers

यवतमाळ : महिनाभरापूर्वी आरटीआय कार्यकर्त्यांचे RTI Worker अपहरण केल्याप्रकरणी जिल्हा कारागृहात District Jail असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका झाली. कारागृहातून बाहेत येताच त्याने शक्तिप्रदर्शन करीत फटाक्यांची आतषबाजी Firecrackers केली. पोलिसांना माहिती मिळताच, घटनास्थळी पोहोचून तब्बल १२ त १४ जणांवर गुन्हे दाखल केले. Crime were registered again 12 to 14 people. 

जिल्हा कारागृहात असलेल्या आरोपीने जामिनावर सुटका होताच समर्थकांसह कळंब चौकात फटाके फोडत शक्तिप्रदर्शन केले. शाज अहेमद नजीर अहेमद (वय ३५ रा. तायडेनगर), रेहान अहेमद (वय २४), सिराज अहेमद (वय ३५), मिर्झा जफर बेग (वय ३१, सर्व रा. समदानी ले-आउट) मोहसिन खान (वय २७, रा. ताजबागनगर) रेहान काश्मिरी (वय २७ रा. कुरेशीपुरा), अकरम अहेमद (वय २५), काल्या पानठेलेवाला (वय २६), शब्बा (वय २५, सर्व रा. कळंब चौक) व इतर तीन ते चार इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गत महिनाभरापूर्वी आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण करण्यात आले होते.  याबाबत शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होताच पोलिसांनी  आरोपींवर गुन्हे दाखल केले होते. 

यादरम्यान अटक केलेल्या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर कारागृहात रवानगी केली. या गुन्ह्यात कारागृहात शाज अहेमद नजीर अहेमद हा सुद्घा होता. दरम्यान या गुन्ह्यांमध्ये १६ जुलै २०२१ रोजी त्याची जामिनावर सुटला झाली. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर समर्थकांसह कळंब चौकात एकत्रित येऊन सामाजिक अंतराचे पालन न करता फटाके फोडून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याबाबतची माहिती पेट्रोलिंगवर असलेल्या शहर पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. साहाय्यक पोलिस निरीक्षक रामकृष्ण भाकडे यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर विजयी अविर्भावात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोश करण्याची पद्धत मागील काही काळापासून फोफावत चालली आहे. याबाबत पोलिसांनी कारवाया केल्यानंतरही त्याला आळा बसू शकलेला नाही. आता पोलिसांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची गरज बोलून दाखवली जात आहे.  अशा गुन्हेगारांवर केवळ गुन्हे दाखल न करता त्यांना तात्काळ अटक करण्याचीही मागणी होत आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com