गटनेते गेटवरच झाले अर्धनग्न, अन् नंतर महापौरांविरोधात दिली पोलिसात तक्रार...

आजपर्यंत अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे पुराव्यानिशी उघड केले. आजच्या आमसभेत करोडो रुपयांच्या एका भ्रष्टाचाराचा मुद्दा पुराव्यानिशी उघडकीस आणणार होतो. ही बाब काही अधिकाऱ्यांच्या मार्फत महापौर आणि आयुक्त यांना माहिती झाली.
Sarkarnama
Sarkarnama

चंद्रपूर : आज अकोला येथे शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवकांनी महानगरपालिकेची ऑनलाइन आमसभा उधळून लावली. तेव्हाच चंद्रपूर महानगरपालिकेसमोरही विरोधी पक्षाचा गोंधळ सुरू होता. महापालिकेत प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे शहरविकास आघाडीचे गटनेते प्रवेशद्वारासमोरच अर्धनग्न झाले Group leader was half naked at the gate आणि त्यानंतर महापौर राखी कंचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

एका महिन्यापूर्वी झालेल्या राड्याची शाई वाळण्याच्या आधीच महानगरपालिकेत पुन्हा आमसभेच्या आधी चांगलाच धिंगाणा झाला. 
आज मनपाची ऑनलाइन आमसभा होती.  सत्ताधारी भाजपने मनपाच्या दोन्ही प्रवेशद्वारांना कुलूप लावले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला. पोलिसांनी आपल्या अधिकाराचे उल्लंघन करीत गटनेत्यांना सभागृहात आणि नगरसेवकांना त्यांच्या कक्षात जाण्यापासून रोखले. त्यामुळे मनपाच्या प्रवेशद्वारावर चांगलाच वाद झाला. शेवटी शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांनी महापौर कंचर्लावार आणि आयुक्त राजेश मोहिते यांची पोलिसात तक्रार केली. 

दुपारी एक वाजता ऑनलाइन आमसभेला प्रारंभ झाला. तत्पूर्वी मनपाच्या दोन्ही प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी शहर पोलिस ठाण्याला पत्र दिले. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. ऑनलाइन आमसभेत गटनेत्यांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यामुळे पोलिसांकडे गटनेत्यांच्या नावाची यादी दिली होती. इतर नगरसेवकांना नगरसेवक कक्षातून सभेला ऑनलाइन उपस्थित राहण्याची परवानगी होती. आमसभेला प्रारंभ झाला. महापौरांसह काही पक्षाचे गटनेते सभेला उपस्थित होते. 

सभेला उपस्थित राहण्यासाठी शहर विकास आघाडीच गटनेते पप्पू देशमुख मनपात आले. परंतु त्यांना प्रवेशद्वारावरच पोलिसांनी रोखले. वारंवार विनंती करूनही पोलिसांनी देशमुख यांना आत जाऊ दिले नाही. त्यावेळी मनपाच्या प्रवेशव्दारासमोर कॉंग्रेस नगरसेवकांचे आंदोलन सुरू होते. त्या नगरसेवकांनाही कक्षात जाण्यापासून अडविण्यात आले. पोलिस आणि सत्ताधाऱ्यांच्या दडपशाही विरोधात  देशमुख यांच्यासह कॉंग्रेसचे नगरसेवक अर्धनग्न झाले. त्यांनी टाळा लावलेल्या द्वाराला लाथा मारणे सुरू केले. त्यामुळे तिथे चांगलाच तणाव निर्माण झाला. 

त्यानंतर देशमुख यांच्या नेतृत्वात नगरसेवक शहर पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी महापौर कंचर्लावार आणि आयुक्त मोहिते यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली. विशेष म्हणजे शहरचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी पोलिसांनी कुणालाच थांबविले नाही, असा दावा केला. पोलिसांना लेखी पत्राव्दारे फक्त गटनेत्यांना आत प्रवेश देण्याची विनंती केली होती, असे आयुक्त मोहिते यांनी सांगितले. महानगर पालिकेच्या दहा वर्षांच्या काळात नगरसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांना मनपात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा नवा पायंडा सत्ताधारी भाजपने पाडला. सर्वसामान्य नागरिकसुद्धा आत प्रवेशासाठी तब्बल तीन तास मनपाच्या समोर उभे होते. 

आपण आजपर्यंत अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे पुराव्यानिशी उघड केले. आजच्या आमसभेत करोडो रुपयांच्या एका भ्रष्टाचाराचा मुद्दा पुराव्यानिशी उघडकीस आणणार होतो. ही बाब काही अधिकाऱ्यांच्या मार्फत महापौर आणि आयुक्त यांना माहिती झाली. त्यामुळे त्यांनी कटकारस्थान रचून आपल्याला पोलिसांच्या मदतीने आमसभेत येण्यापासून रोखले. पोलिसात तक्रार केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करू.
पप्पू देशमुख, गटनेते शहरविकास आघाडी.

कॉंग्रेसचे सद्बुद्धी आंदोलन..
नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या  नगरसेवकांना सद्बुद्धी आंदोलन केले. यावेळी मनपाच्या प्रवेशव्दारासमोर होम हवन केले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे पाचशे मेगावॉटचे दोन संच महानगरपालिका हद्दीत येतात. मात्र त्यांच्याकडून टॅक्स वसूल केला पाहिजे आणि मनपातील घोटाळ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनात कॉंग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर,  
नगरसेवक सुनीता लोढीया, अशोक नागपूरे, संगीता भोयर, अमजद मन्सूर अली, देवेंद्र बेले, ललिता रेवालीवर, कलामती यादव आदी सहभागी झाले होते.
Edited By : Atul Meher

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com