‘हे’ माजी आमदार गुरुवारी अजित पवारांना भेटणार, भाजपला मोठा धक्का !

तोडसाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसोबतही चर्चा झाली. तोडसाम यांचे सोबत भाजपचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Raju Todsam Arni.
Raju Todsam Arni.

यवतमाळ : पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात भाजपला खिंडार पडणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. असे असताना पश्‍चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही भाजपला मोठा धक्का बसेल, अशी चिन्हे दिसू लागली आहे. भाजपचे माजी आमदार प्रा. राजू तोडसाम Former MLA of BJP Raju Todsam हे गुरुवारी, २९ जुलैला मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांची भेट घेणार आहेत आणि त्याच दिवशी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील. भाजपसाठी जिल्हात हा मोठा धक्का असणार आहे. Big blow to bjp.  

लोकसभा निवडणुकीत पक्षांच्या उमेदवाराला मोठी लीड दिली. आर्णी विधानसभेतील सहकार क्षेत्रात पक्ष वाढविला. यानंतर पक्षाने तयारी करण्याचा शब्द देऊन ऐनवेळी विधानसभेची उमेदवारी नाकारली. यामुळे पक्षात नाराज असलेले माजी आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या विधानसभा मतदार संघात पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य राहील, त्या विधानसभा क्षेत्रातील उमेदवार कायम राहील, असे ठरले होते. तसा शब्द पक्षाकडूनच देण्यात आला होता. 

आर्णी विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य होते. यानंतरही उमेदवारी नाकारल्या गेल्याची खंत प्रा.तोडसाम यांच्या मनात आहे. शिवाय, काही व्यक्तिगत आरोपांचे भांडवल केल्या गेले. यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी पक्षाने संधी दिली नसल्याची खंत तोडसाम यांच्या मनात आहे. विधानसभा निवडणुकीत तोडसाम यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. निवडणुकीत मोठा जनाधार त्यांना मिळाला. मात्र, त्यापूर्वी किंवा त्यानंतर भाजपकडून त्यांना फारसे विश्‍वासात घेतले गेले नाही. त्यामुळे अखेर भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय माजी आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी घेतला आहे. 

लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. यासंदर्भात तोडसाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसोबतही चर्चा झाली. तोडसाम यांचे सोबत भाजपचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रक्षप्रेवशाबाबत 29 जुलै रोजी तोडसाम उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे. या भेटीत प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे.

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारेल. आर्णी विधानसभा मतदार संघासोबत जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे.
- प्रा. राजू तोडसाम, माजी आमदार.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com