पिक पाहणीबाबत सरकारच्या हेतूवर शेतकऱ्यांना शंका, तांत्रिक बाबीत अडकली प्रक्रिया...

पीक पाहणी व पीक नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया शेतकऱ्यांना स्वतःच्या ॲन्डरॉईड मोबाईलने पार पडायची आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्डरॉईड मोबाईल नाही. मोबाईल असणाऱ्यांना शेतकऱ्यांना माहिती नोंदविता येत नाही. अनेक परिसरात नेटवर्कची समस्या आहे.
Sarkarnama
Sarkarnama

चंद्रपूर : राज्य शासनाने State Government सुरु केलेल्या पीक पाहणी व पीक नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया शेतकऱ्यांना स्वतःच्या ॲन्डरॉईड मोबाईलने  पार पडायची आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्डरॉईड मोबाईल नाही. मोबाईल असणाऱ्यांना माहिती नोंदविता येत नाही. एवढेच नाही, तर अनेक परिसरांत नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे सरकारला पिक पाहणी व पेरा नोंदणी करायची आहे की नाही, असा प्रश्‍न शेतकरी करीत आहे. येवढ्या तांत्रिक बाबींमध्ये ही प्रक्रिया अडकवल्याने सरकारच्या हेतूवरच शेतकऱ्यांना शंका आहे. Farmers have doubt about the governments intentions regarding crop inspection.

राज्य शासनाने पीक पाहणी व पीक पेरा नोंदणी सुरु केली आहे. १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत ही ऑनलाइन मोहीम राबविली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान शेतीमालकाचे नाव, शेतीत घेतले जात असलेले पीक, मशागत करणाऱ्याचे नाव, गट क्रमांक, गावाचे नाव यांसह अन्य माहिती नोंदवायची आहे. कर्जप्रकरण व अन्य सुविधांबाबत ही माहिती राज्य शासन विचारात घेणार आहे. मात्र, शासनाने ही प्रक्रिया सुरु करताना अनेक बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तांत्रिक बाबीत अडली आहे. 

आजघडीला ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्डरॉईड  मोबाईल नाही. ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल आहे, त्यांना माहिती नोंदविताना अनेक अडचणी येत आहेत. तसेच अनेक परिसरात नेटवर्कचीही  समस्या आहे. त्यामुळेच ऑगस्ट महिना लोटूनही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. ऑनलाइन नोंदणी न करणारे शेतकरी भविष्यात अनेक योजनांपासून वंचित राहू शकतात.  

शासकीय योजनांपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने ही प्रक्रिया ऑफलाइन राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पिंपळकर यांनी केली आहे. चंद्रपूरचे तहसीलदार नीलेश गौंड यांना निवेदन देताना कमलाकर निब्रड, विठ्ठल भोयर, महेंद्र बेरड, संदीप पिंपळकर, संजय तुराणकर, अतुल मोहितकर, विठ्ठल पिंपळकर, हरिओम पोटवले, सुरेश चौधरी, संतोष मत्ते, विनोद देवतळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

मशागतीच्या कामात नोंदणीचे टेन्शन 
ग्रामीण भागातील शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त आहे. कापूस, सोयाबीन व अन्य पिके फुलोऱ्यावर आहेत. त्यामुळे फवारणी, खत देणे अशी अनेक कामे शेतकरी करीत आहेत. अशात आता राज्य शासनाने ऑनलाइन पीक पाहणी व पीक पेरा नोंदणी प्रक्रिया सुरु केली. ३० सप्टेंबरपर्यंत माहिती नोंदविणे अनिवार्य केले. त्यामुळे शेतीची कामे सोडून ही माहिती भरण्याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यातही ॲन्डरॉईड मोबाईल नसणाऱ्या शेकऱ्यांसमोर मोबाईल कुठून आणायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पीक पाहणी व पीक नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया शेतकऱ्यांना स्वतःच्या ॲन्डरॉईड मोबाईलने  पार पडायची आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्डरॉईड  मोबाईल नाही. मोबाईल असणाऱ्यांना शेतकऱ्यांना माहिती नोंदविता येत नाही. अनेक परिसरात नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे ही प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबवावी. 
- पारस पिंपळकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य, पिपरी, जि. चंद्रपूर.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com