शेतकऱ्यांसाठी डॉ. बोंडे झाले आक्रमक, तहसीलदारांच्या कक्षाला ठोकले कुलूप…

नुकसानीच्या अनुदानाची यादी बँकेत दिल्याने जवळच्या नागरिकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली होती. याप्रकरणात घोळ असल्याने यावर ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी डॉ. बोंडे यांनी केली.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

मोर्शी (जि. अमरावती) : राज्यातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करत आहे. पण राज्य सरकारचे लक्ष त्यांच्याकडे नाही. घोषणा करण्यापलीकडे सरकार गेलेले नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे Former Agriculture Minister Dr. Anil Bonce आक्रमक झाले. आज त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तहसीलदारांच्या कक्षाला कुलूप ठोकले. Locked the tahasildars office.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्यास टाळाटाळ होत आहे. अतिवृष्टी व गारपीट झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मोबदला देण्यात यावा. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पैशात घोळ झालेला आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही तहसीलदारांकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने आज डॉ. अनिल बोंडे यांनी मोर्शी तहसीलदार यांच्या कक्षाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन त्वरित सुरू करण्यात यावे, श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मानधन देण्यात येणारी बोगस यादीची चौकशी करून ती यादी रद्द करून पात्र लाभार्थ्यांनाच मानधन वितरित करण्यात यावे, या प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत. डॉ. बोंडे यांच्या नेतृत्वात मोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर येऊन धडकले. मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना देण्यात आले. यावेळी आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अमरावती जिल्हा दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. याशिवाय मोर्शीचे पोलीस तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी शेतकरी आले असता, दोन्ही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे तहसीलदारांच्या कार्यालयाच्या दाराला निवेदनाची प्रत चिकटविण्यात आली. तसेच तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. नुकसानीच्या अनुदानाची यादी बँकेत दिल्याने जवळच्या नागरिकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली होती. याप्रकरणात घोळ असल्याने यावर ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी डॉ. बोंडे यांनी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतातील बंद असलेला वीजपुरवठा त्वरित सुरू करावा, त्यांना बिल भरण्याचा तगादा लावू नये, असे डॉ. बोंडे म्हणाले. 

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेत वयात न बसणाऱ्या लोकांची पैशाची मागणी करून काम करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे यामध्ये चौकशी करून पात्र लोकांना मानधन द्यावे तसेच अपात्र लोकांची चौकशी करण्याचीसुद्धा मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आजच्या आंदोलनात भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष अशोक ठाकरे, सुनील सोमवंशी, प्रवीण राऊत, देव बुरंगे, अजय आगरकर, ज्योतिप्रसाद मालवीय, आप्पा गेडाम, हरिदास गेडाम, नितीन राऊत, नीलेश शिरभाते, अशोक ठाकरे, विलास आखाडे, रवी मेटकर, श्री. ढाकुलकर, श्रीकांत मांडवे, आशिष वानखडे, लुंगे, सतीश लेकुरवाळे, शशिकांत खेडेकर, सुवर्णा साठवणे, अनिता लांजेवार तसेच इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com