मुलगी पटत नाहीये म्हणून निराश झालेल्या तरूणाने आमदारांना लिहिले 'हे' पत्र

‘मला एकही मुलगी पटत नाहीये’, असे पत्र भूषण जांबुवंत राठोड याने आमदारांना लिहिले. त्यावर बोलताना राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे म्हणाले, माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील एका अतिउत्साही तरुण कार्यकर्त्याने मला पत्र लिहिले. ते पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. पण हा तरुण अद्याप मला भेटला नाही.
Sarkarnama
Sarkarnama

चंद्रपूर : आपल्या मतदारसंघातील आमदारांना कुठल्या समस्या सांगितल्या पाहिजे, कोणते प्रश्‍न त्यांच्याकडून सोडवून घेतले पाहिजे, याचे म्हणावे तसे निकष ठरलेले नाहीत. पण तरीही आमदारांना कोणती कामे सांगावी, याबाबत तारतम्य ठेवलेच पाहिजे. मुलगी पटत नाहीये, म्हणून एका तरुणाने निराश होऊन चक्क आमदारांना पत्र लिहिले. As the girl did not agree youth wrote a letter to mla हे पत्र सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होते आहे. Viral on Social Media. 

एकही मुलगी भाव देत नाही, म्हणून भूषण जांबुवंत राठोड हा तरुण चांगलाच खचला. त्यामुळे त्याने चक्क राजुऱ्याचे आमदार आमदार सुभाष यांना पत्र लिहिले. भूषण हा राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या एका खेडेगावातील आहे. आपल्याला मुलगी पटत नाहीये आणि ही चिंतेची बाब आहे, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. मुलगी पटवण्यासाठी भूषण दररोज राजुरा ते गडचांदूर जाणे-येणे करतो. तरीही आजवर एकाही मुलीने त्याला भाव दिला नाही, ही त्याची खंत आहे. 

पत्रात हा तरुण लिहितो की, दारू विकणाऱ्या आणि काळ्या रंगाच्या पोरांनाही गर्लफ्रेन्ड आहेत, हे बघून माझा जीव जळून राख होतो. हा भूषण राठोड कोणत्या गावातील आहे, हे अद्याप कळलेले नाही. पण त्याने आमदारांना विनंती केली आहे की, राजुरा विधानसभा मतदारसंघातील मुलींना आपण प्रोत्साहित करावे, जेणेकरून मुली मला भाव देतील. असे अफलातून पत्र लिहिल्यामुळे त्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. हे पत्र सोशल मिडियावर जरी व्हायरल झाले असले, तरी आमदार महोदयांपर्यंत ते पोहोचलेले नाही. 

काय म्हणाले आमदार सुभाष धोटे...
‘मला एकही मुलगी पटत नाहीये’, असे पत्र भूषण जांबुवंत राठोड याने आमदारांना लिहिले. त्यावर बोलताना राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे म्हणाले, माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील एका अतिउत्साही तरुण कार्यकर्त्याने मला पत्र लिहिले. ते पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. पण हा तरुण अद्याप मला भेटला नाही. जर तो मला येऊन भेटला, तर आमदार म्हणून त्याला काय दुःख आहे. ते जाणून घेऊन त्याला नक्की मदत करू. पण पत्र लिहून परस्पर सोशल मिडियावर व्हायरल करणे, हे मला बरोबर वाटत नाही. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com