कोरोनाने होळीचे रंग केले फिके, मांसाहार शौकिनांना व्हावे लागेल तत्पर... - corona made hole pale non vegetarians have to be a ready | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

कोरोनाने होळीचे रंग केले फिके, मांसाहार शौकिनांना व्हावे लागेल तत्पर...

राजेश प्रायकर 
शुक्रवार, 26 मार्च 2021

धुळवडीला हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपाहारगृहातील प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, परंतु पार्सल सुविधा सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याबाबतही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 

नागपूर : होळी जवळ आली की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचीच लगबग सुरू होते. होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशीची रंगपंचमी म्हणजे सर्वंच जण रंगांत न्हाऊन निघतात. पण यावर्षी कोरोनाने होळीचे रंग फिके केले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महानगरपालिकेने कडक बंधने लावली. त्यामुळे यंदा होळी, धुळवडीच्या उत्साहावर विरजण पडले आहे. २९ मार्चला धुळवडीच्या दिवशी मटण तसेच भाजीपाला, किराणा दुकाने (स्टॅण्ड अलोन) दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. त्यामुळे धुळवडीला मांसाहाराच्या शौकिनांना मटण खरेदीसाठी तत्परता दाखवावी लागणार आहे. 

शहरात दररोज अडीच ते तीन हजार बाधित आढळून येत आहे. त्यामुळे शहरासाठी महापालिका प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज होळी व धुळवडीसाठी विशेष आदेश काढले. होळी, धुळवडीला पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येणार नाही. सार्वजनिकरीत्या होळी, धुळवड साजरी करण्यास बंदी लावण्यात आली आहे. मिरवणूक काढण्यासही बंदी लावण्यात आल्याने एकत्रितरीत्या फिरून होळीचा आनंद लुटता येणार नाही.

धुळवडीच्या दिवशी स्टॅण्ड अलोन स्वरूपातील मटण, मासे, अंडी, भाजीपाला, किराणा दुकाने दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे धुळवडीला मटण, मासे, चिकन दुकानांत तुंबड गर्दीचा अनुभव बघता खवय्यांना सकाळी उठून मटण दुकानांकडे पळावे लागणार आहे. 

हेही वाचा : आशा भोसलेंचे उपराजधानी नागपूरशी आहेत जुने ऋणानुबंध...
 
हॉटेल्स, रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल सुविधा 
धुळवडीला हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपाहारगृहातील प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, परंतु पार्सल सुविधा सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याबाबतही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख