काँग्रेसचे महासचिव जिया पटेलांचा आत्महत्येचा प्रयत्न, उपराजधानीत खळबळ 

पटेल यांच्या मुलीला हृदयाचा दुर्मिळ आजार आहे. असा आजार असलेल्यांची अतिरिक्त परीक्षा घेण्याची तरतूद विद्यापीठ कायद्यात आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाने रुझैयना पटेल हिची अतिरिक्त परीक्षा घेण्याचे आदेश दिले. तिची अतिरिक्त परीक्षा घेऊन नवी गुणपत्रिका विद्यापीठाकडे पाठविण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
Fire
Fire

नागपूर : दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीला थेअरीच्या आठपैकी सात विषयांत शून्य गुण दिल्यामुळे संतप्त झालेले वडील आणि काँग्रेसचे महासचिव जिया पटेल यांनी आज महाविद्यालयात अंगावर पेट्रोल शिंपडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने उपराजधानीत खळबळ माजली आहे. 

जिया पटेल यांची मुलगी रुझैयना पटेल ही दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयात अंतिम वर्षाला शिकते. तिला थेअरीच्या आठपैकी सात विषयांत शून्य गुण दिल्यामुळे संतप्त होऊन आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पटेल यांनी सांगितले. ऑक्टोबर २०२० मध्ये परीक्षा झाली होती. १९ डिसेंबर २०२० ला निकाल आला होता. फेरमूल्यांकन तारीख २६ डिसेंबर होती. हा सर्व सोपस्कार करून ८ जानेवारी २०२१ ला निकाल आला. त्यात रुझैयनाला अनुपस्थित असल्याचे कारण देत महाविद्यालयाने अंतर्गत शून्य गुण दिले होते. त्याविरोधात जिया पटेल यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. 

पटेल यांच्या मुलीला हृदयाचा दुर्मिळ आजार आहे. असा आजार असलेल्यांची अतिरिक्त परीक्षा घेण्याची तरतूद विद्यापीठ कायद्यात आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाने रुझैयना पटेल हिची अतिरिक्त परीक्षा घेण्याचे आदेश दिले. तिची अतिरिक्त परीक्षा घेऊन नवी गुणपत्रिका विद्यापीठाकडे पाठविण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार २८ फेब्रुवारी ते ४ मार्च अशी तिची एकटीची परीक्षा घेण्यात आली. पण, तिची मार्कशिट विद्यापीठाकडे पाठवण्यास महाविद्यालयाने नकार दिला. 

येत्या आठ मार्च २०२१ रोजी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आहे. त्यांच्या निकालासोबत आपल्या मुलीचेही गुण आणि गुणपत्रिका पाठवण्यात येईल, अशी भूमिका दंत महाविद्यालय प्रशासनाने घेतली. त्यावर या परीक्षेशी आमच्या मुलीचा काहीही संबंध नाही आणि असेच करायचे होते तर तिची एकटीची परीक्षा का घेतली असे म्हणत पटेल यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर डीन बर्फीवाला यांच्यासोबत बैठक झाल्यावर पटेल यांच्या मुलीची गुणपत्रिका तयार करून विद्यापीठाकडे पाठवण्यात आली. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com