सख्ख्या भावानेच लाटले बहिणीचे २७ कोटी रुपये, बॅंक मॅनेजरही सामील… - brother stole rs 27 crore from sister bank manager also involved | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

सख्ख्या भावानेच लाटले बहिणीचे २७ कोटी रुपये, बॅंक मॅनेजरही सामील…

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 जुलै 2021

पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी नंदकिशोर जयस्वाल यांची बहीण अमरावती रहिवासी जयश्री अजयकुमार मोरया यांचे वसंतनगर परिसरामध्ये वाईन शॉपचे दुकान होते. त्यावर नंदकिशोर जयस्वाल हा नोकरनाम्यावर काम करीत होता.

यवतमाळ : सख्ख्या बहिणीच्या नावे बॅंकेत बनावट खाते Froud Account उघडून भावाने २७ कोटी रुपये Rs. 27 crore हडपल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये बॅंक मॅनेजरसह ९ जण सहभागी असल्याचे तपासात पुढे आले आहे. Including bank manager 9 people are involved नोकरनाम्यावर काम करणाऱ्या भावाने येवढी मोठी फसवणूक केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 

पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी नंदकिशोर जयस्वाल यांची बहीण अमरावती रहिवासी जयश्री अजयकुमार मोरया यांचे वसंतनगर परिसरामध्ये वाईन शॉपचे दुकान होते. त्यावर नंदकिशोर जयस्वाल हा नोकरनाम्यावर काम करीत होता. वाईन शॉप दुकान मालक जयश्री ह्या अमरावती येथे राहत असल्याने दुकानाचे सर्व व्यवहार, माल घेणे-देणे विकणे आदी कामकाज नंदकिशोर व त्याची पत्नी रश्मी जयस्वाल हे पाहत होते. दरम्यान जयश्री मोरया यांच्या मुलीच्या लग्नासाठी नंदकिशोर यांच्याकडून पैसे मागितले असता त्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर वसंतनगर पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली. 

नंदकिशोर जयस्वाल त्यांची पत्नी रश्मी व भाऊ रवी जयस्वाल यांच्यासह इतर नातेवाईक व अकोला जनता को-ऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर तथा अकाउंटंट यांनी संगनमत करून जयश्री मोरया यांच्या बनावट सह्या करून चेकबूक आणणे, सह्या बदलविणे अशाप्रकारे फसवणूक करीत या कामी बँक अधिकारी यांनी खातेदाराची शहानिशा न करता सही बदलवण्यात सहकार्य केले. यामध्ये बॅंक मॅनेजरेही हात ओले झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच आरोपींनी दुकानात बोलविलेल्या मालाचे डीलरला नगदी पैसे न देता त्या रकमेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला. ती रक्कम हडप केली, त्या रकमेचा अपहार केला. 

हेही वाचा : बावनकुळे म्हणाले, नाना पटोलेंची स्वबळाची भाषा म्हणजे निव्वळ नौटंकी..

डीलरच्या रकमेच्या बदल्यात जयश्री मोरया यांच्या सहीचे चेक देऊन सत्तावीस कोटी पंचवीस लाख 34 हजार, 860 रुपयांची मागील चार वर्षांमध्ये अफरातफर केल्याची तक्रार जयश्री अजयकुमार मोरया यांनी वसंतनगर पोलीस स्टेशनला दिली, तक्रारीवरून नंदकिशोर जयस्वालसह इतर नातेवाईक व बँक मॅनेजर अकाउंटंट यांचे विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 408, 420, 424, 465, 467, 468, 471, 477 ए, सह 34 व 120 ब अनुसार गुन्हे दाखल करून पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी या प्रकरणाच्या अफरातफर बाबतच्या चौकशीस सुरुवात केली आहे. सत्तावीस कोटी सारख्या मोठ्या रकमेची अफरातफर होऊन त्यात गुन्हा दाखल होण्याची बहुदा यवतमाळ जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख