मुलगा रातोरात ६७० किलोमीटरचा प्रवास करून पोचला, पण तोपर्यंत वडिलांनी प्राण सोडला.. - the boy traveled 670 km in the night but by then the father had died | Politics Marathi News - Sarkarnama

मुलगा रातोरात ६७० किलोमीटरचा प्रवास करून पोचला, पण तोपर्यंत वडिलांनी प्राण सोडला..

दिनकर गुल्हाने
बुधवार, 19 मे 2021

घराचा सांभाळ करणारे वडील अचानक गेल्याने निरज व कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले. आर्थिक स्थिती अतिशय बिकट असल्याने अंत्यसंस्कारासाठी बंजारा कॉलनीतील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. निरजची बहीण दहावीला असून त्यांच्या पुढील शिक्षणाच्या खर्चासाठी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुसद (जि. यवतमाळ) : येथील प्रेमसिंग गोपू नाईक Premsing Gopu Naik यांना कोरोनाची लागण झाली. त्यातून ते बरेही झाले. पण पुन्हा अचानक प्रकृती बिघडली. Again suddenly the health deteriorated मग त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा निरज कर्नाटकातील हुबळी येथे एमबीबीसच्या द्वितीय वर्षाला शिकतोय. Niraj is studying in the second year of MBBS at Hubli in Karnataka वडिलांची प्रकृती गंभीर आहे, हे कळताच मुलगा दुचाकीने निघाला, रातोरात ६७० किलोमीटरचा प्रवास करून पोचला. He raveled 670 kilometers overnight पण तोपर्यंत वडिलांनी प्राण सोडले होते. वडिलांच्या पार्थिवाचेच दर्शन घेण्याचा दुर्दैवी प्रसंग निरजवर ओढवला.

निरजचे वडील प्रेमसिंग नाईक (वय ४९) हे मूळ कर्नाटकातील बिजापूरचे रहिवासी. मात्र, उदरनिर्वाहासाठी ते २५ वर्षापासून पुसद येथे स्थायिक झाले. सुरुवातीला ते बंजारा कॉलनीत राहत. पुसद पंचायत समितीसमोर त्यांची चहाची कॅन्टीन होती. आई निमा मोलमजुरी करून संसाराला हातभार लावत होती. त्यांना निरज हा मुलगा व निर्जला मुलगी. दोघेही अभ्यासात हुशार. निरजला दोन वर्षापूर्वी नीट परीक्षेत ४७० गुण मिळाले व त्याचा कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, हुबळी येथे एमबीबीएससाठी प्रवेश निश्चित झाला. चहा विक्रेत्याचा मुलगा डॉक्टर होत असल्याने समाजातील दात्यांनी त्याच्या प्रवेशासाठी आर्थिक मदत केली. तो आता एमबीबीएस द्वितीय वर्षाला आहे. 

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्याचा मानस होता. मात्र, कोविडच्या महामारीत त्याच्या वडिलांचा १३ मे रोजी रात्री पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या वडिलांना व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकले नाही. मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत असताना तो वडिलांना वाचवू शकला नाही, याचे शल्य निरजला आहे. त्याचे वडील प्रेमसिंग हे १२ मे पर्यंत स्वस्थ होते. नंतर त्यांची ऑक्सिजन पातळी घसरल्याने श्वास थांबला. त्यापूर्वी त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले व ते बरेही झाले. त्यांच्या कोविडच्या तिन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्यात. त्यांचा मृत्यू ‘रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’मुळे झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. 

हेही वाचा : मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचे तळ्यात-मळ्यात

घराचा सांभाळ करणारे वडील अचानक गेल्याने निरज व कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले. आर्थिक स्थिती अतिशय बिकट असल्याने अंत्यसंस्कारासाठी बंजारा कॉलनीतील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. निरजची बहीण दहावीला असून त्यांच्या पुढील शिक्षणाच्या खर्चासाठी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन वर्षांपासून निरजचे वडील श्रीरामपुरातील पेट्रोल पंपाजवळ फळ विक्रीचा व्यवसाय करीत होते. लॉकडाऊनच्या काळात निरज आता फळविक्रीचा व्यवसाय सांभाळत आहे. अचानक उद्भवलेल्या संकटामुळे निरजचे कुटुंबीय दुःख सागरात बुडाले आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख