राजकीय चष्म्यातून बघितले जात आहे भाजपचे गटनेते आणि काॅंग्रेसच्या शहर अध्यक्षांच्या भेटीकडे

यदाकदाचित दगाफटका झाला तर इतर पक्षांतील मित्र मदतीला येतील, असे आश्वासन तिवारी यांनी देशमुख यांना दिल्याचे समजते. मात्र देशमुख यांची भेट राजकीय असल्याचे तिवारी यांनीफेटाळून लावले.
Sarkarnaa Banner
Sarkarnaa Banner

चंद्रपूर : भाजपच्या  नगरसेवकांनी BJP Corporators आपली भेट घेतली. मनपातील गैरव्यवहाराच्या तक्रारी दिल्या, असा दावा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले State President of Congress Nana Patole यांनी चंद्रपुरातील दाैऱ्यात Chandrapur Tour केला हाेता. पटाेलेंच्या दाव्याला तीन दिवसांचा कालावधी लाेटला असतानाच काॅग्रेसचे शहराध्यक्ष रामू तिवारी Ramu Tiwari यांनी भाजपचे गटनेते वसंता देशमुख Vasant Deshmukh यांची आज सदिच्छा भेट घेतली. या भेटीला येत्या काही दिवसांत हाेणाऱ्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

महानगर पालिकेत भाजपची सत्ता आहे. सलग तीन वर्ष स्थायी समिती सभापतीपदी राहूल पावडे हाेते. चवथ्या वर्षात त्यांना हटविले जाईल, अशी चर्चा भाजपच्या नगरसेवकांमध्ये हाेती. मात्र काेराेनाची पहिली लाट आली आणि पावडे बचावले. तब्बल नऊ महिने निवडणुकाच झाल्या नाही. त्यानंतर शासनाने काेराेनाच्या काळातील निर्बंध हटविले आणि पावडे यांची सभापती पदावरुन उचबांगडी झाली. त्यांच्या ऐवजी रवी आसवानी यांना संधी मिळाली. मात्र सभापतीच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांत उघड दाेन गट पडले.

भाजपचे मनपातील सभागृह आणि गटनेते वसंता देशमुख यांंना सभापतीपदाचे आश्वासन पक्षनेतृ्त्वाने दिले होते. त्यांना सभागृह नेते पदाचा राजीनामासुद्धा द्यायला लावला. देशमुख हे सलग चारवेळा निवडून आले आहेत. ते वरिष्ठ नगरसेवक आहे. त्यांची सभापतीपदी वर्णी लागेल, याबाबत सारेच आश्वस्त हाेते. परंतु शेवटच्या क्षणी अचानक आसवानी यांचे नाव पुढे आले. त्यानंतर देशमुख यांनी उघड नाराजी व्यक्त केली. आसवानी यांना केवळ तीन महिन्यांचा काळ सभापती पदासाठी मिळाला. त्यांच्या सभापती पदाचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२१ राेजीच संपला. परंतु आसवानी यांच्याही मदतीला काेराेना धावून आला.

देशमुख यांनी आसवानी यांचा कार्यकाळ संपल्याने. स्थायी समितीच्या सभापतीची निवडणुक घेण्यासाठी आयुक्तांना पत्र दिले.  परंतु लगेचच काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत सचारबंदी लागू झाली. निवडणुकांवर बंदी आली. त्यामुळे आसवानी बचावले. आता निर्बंध शिथील केले आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांनीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी दिली आहे. येत्या काही दिवसांतच यासंदर्भात नगर विकास मंत्रालयाकडून अधिसूचना निघणार आहे. त्यामुळे देशमुख यांनीही या निवडणुकीची तयारी चालविली आहे.

या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी घेतलेल्या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. देशमुख गटनेते आहेत. स्थायी समितीत १६ सदस्य आहे. यात भाजप दहा, काॅंग्रेस तीन, बसपा दाेन आणि शहर विकास आघाडीच्या एक सदस्याचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी ईश्वर चिठ्ठीने आठ सदस्य बाहेर पडतात. यातून बचावलेले आणि दाेन वर्ष स्थायी समितीचा सदस्य असलेले सदस्य आपाेआप निवृत्त हाेतात. आता भाजपचे विद्यमान सभापती आसवानी, संजय कंचर्लावार आणि सुभाष कासनगाेट्टवार निवृत्त हाेणार आहेत. देशमुख आणि निवृ्त्त हाेणाऱ्या भाजप सदस्यांची संख्या बघता ही  नावे ते पुन्हा स्थायी समितीच्या सदस्यासाठी पाठविणार नाहीत. याशिवाय निवृत्त हाेणाऱ्या आठ सदस्यांमध्ये पक्षाकडून नावे पाठविण्याचा गटनेते म्हणून त्यांनाच अधिकार आहे.

यदाकदाचित दगाफटका झाला तर इतर पक्षांतील मित्र मदतीला येतील, असे आश्वासन तिवारी यांनी देशमुख यांना दिल्याचे समजते. मात्र देशमुख यांची भेट राजकीय असल्याचे तिवारी यांनी फेटाळून लावले. ते आमचे मित्र आहे. सत्ताधारी भाजपचे गटनेते आहे. त्यांच्याशी विकास कामांवर चर्चा झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु तिवारी शहर अध्यक्ष हाेवून दीड वर्षांचा कार्यकाळ लाेटला. या काळात त्यांना देशमुख आणि विकास कामांची आठवण आली नाही. त्यामुळे या भेटीला राजकीय चष्म्यातून बघितले जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com