भुजबळांनी आवळल्या हायप्रोफाईल 19 जुगाऱ्यांच्या मुसक्या, अन् पथकाला दिले २५ हजारांचे बक्षीस - bhujbal took action on nineteen high profile gambler and gives prize to the team | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

भुजबळांनी आवळल्या हायप्रोफाईल 19 जुगाऱ्यांच्या मुसक्या, अन् पथकाला दिले २५ हजारांचे बक्षीस

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 14 जून 2021

स्वरा फार्महाउसमधील ही कारवाई जिल्हा पोलिस दलाचे इतिहासातील सर्वांत मोठी व प्रशंसनीय अशी कामगिरी मानली जात आहे. राजकीय पाठबळ असल्याने आतापर्यंत कुणीही छापा टाकण्याचे धाडस केले नाही. मात्र, पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी विशेष पथकास 25 हजारांचे रोख व प्रशस्तिपत्र जाहीर केले.

यवतमाळ : कितीही कारवाया झाल्या तरी जुगारी आपला शौक भागवण्यासाठी काहीतरी करतातच. असाच एक अड्डा शहरापासून जवळच असलेल्या स्वरा फार्म हाउसमध्ये Swara Fare House जुगाऱ्यांनी Gamblers बनवला होता. या अड्ड्य़ावर आतापर्यंत कुणीही धाड टाकण्याची हिंमत केली नव्हती. Nobody can daired to take action  पण पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ Dr. Dilip Patil Bhujbal यांनी या अड्ड्य़ावर कारवाई केली आणि १९ जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. जिल्ह्याच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कारवाई ठरली.The prize of twenty five thousand त्यामुळे अधीक्षकांनी कारवाई करणाऱ्या पथकाला २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्र देण्याची घोषणा केली. 

गेल्या काही वर्षांपासून जुगाऱ्यांसाठी सुरक्षित ठरत असलेल्या हायप्रोफाईल स्वरा फार्म हाउसमध्ये छापा टाकून ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या दरम्यान शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील भारी गावानजीक करण्यात आली. पोलिसांनी यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांतील 19 जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारी गावाजवळ असलेल्या या स्वरा फार्महाउसमध्ये हायप्रोफाइल जुगार सुरू असल्याची टीप पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाली. त्यावरून त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले. 

पोलिसांच्या छापेमारीत जुगार खेळ सुरू असल्याचे समोर आले. यावेळी गब्बर मोतेखान पठाण (वय 42, रा. रामनगर, यवतमाळ), आशीष शत्रुघ्न मडावी (वय 33, रा. बेवाडा जि. चंद्रपूर), विनोद कवडू जिवतोडे (वय 40, रा. वणी), मोहमद अफझल ईसराल अहमद सिद्दीकी (वय 28, रा. इंदिरानगर, ता. घुग्गुस), हाफीज खलिल रेहमान (वय 52, रा. गुरुनगर, वणी), मोवीन शेख (वय 30, रा. घुग्गुस), जगदीश गुरुचरण पाटील (वय 37, रा. राजुरकॉलरी), सरफौदीन नन्ने शाह (वय 52, रा. राजुरा), शंकर नानाजी खैरे (वय 29, रा. महाकालीनगर, घुग्गुस), नीलेश बाबाराव झाडे (वय 34, रा. रामनगर, घुग्गुस), सुखदेव दत्तुजी दंदे (वय 37, रा. गिरीजानगर यवतमाळ), शंकर हनुमंत अत्राम (वय 34, रा. चुनाभट्टी, ता. राजुरा), अमीत यशवंत पाटील (वय 32, रा. रामपूर, ता.राजूर), नंदकुमार रामराव खापणे (वय 29, रा. कोलगाव ता. मारेगाव), दीपक शरदराव धात्रक (वय 36, रा. बसस्थानक, यवतमाळ), राहुल संजय चित्तलवार (वय 20, रा. शिवनगर ता. घुग्गुस), निखिल अरविंद कुडमेथे (वय 20, रा. शिवनगर ता. घुग्गुस), आकाश पृथ्वीराज तिवारी (वय 31, रा. बाजोरीयानगर, यवतमाळ), रामेश्वर दत्ताजी व्यवहारे (वय 44, रा. रामकृष्णनगर, यवतमाळ) हे जुगार खेळताना आढळले. 

सर्व जुगाऱ्यांविरोधात यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ माधुरी बाविस्कर, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पुरी, साहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन करेवाड, गजानन डोंगरे, विशाल भगत, सुमित पाळेकर, नीलेश राठोड, उल्हास कुरकटे, मोहमद भगतवाले आदींच्या पथकाने केली. 

हेही वाचा : अखेर संभाजीराजे व उदयनराजे भेटणार  

डावावर 19 लाखांची रोकड
या 19 जुगाऱ्यांकडून डावावरील 19 लाख 23 हजार रुपये रोख, एक लाख 30 हजार रुपये किमतीचे सात मोबाईल, 60 लाख 70 हजार रुपये किमतीची पाच चारचाकी वाहने, दोन दुचाकी असा एकूण 81 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पथकाला 25 हजारांचे बक्षीस
स्वरा फार्महाउसमधील ही कारवाई जिल्हा पोलिस दलाचे इतिहासातील सर्वांत मोठी व प्रशंसनीय अशी कामगिरी मानली जात आहे. राजकीय पाठबळ असल्याने आतापर्यंत कुणीही छापा टाकण्याचे धाडस केले नाही. मात्र, पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी विशेष पथकास 25 हजारांचे रोख व प्रशस्तिपत्र जाहीर केले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख