भंडारा जळीतकांड प्रकरण : दोन परिचारीकांविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली तक्रार दाखल

भंडारा येथे ९ जानेवारीला पहाटे घडलेल्या जळीत कांडप्रकरणी दोनपरिचारिकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Bhandara District Hospital
Bhandara District Hospital

नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे १० नवजात बालकांचा होरपळून, गुदमरून मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांनी भेट देऊन मृत बालकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून चौकशीसंदर्भात सूचना दिल्या होत्या. आता जवळपास दीड महिन्यानंतर दोन परिचारिकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण वायकर यांनी ही तक्रार दिली असल्याची माहिती राज्याचे डीजीपी हेमंत नगराळे यांनी दिली. 

परिचारिका शुभांगी साठवणे आणि स्मिता आंबीलडुके या दोन परिचारिकांवर १० नवजात बालकांच्या मृत्यूसाठी हलगर्जीपणा आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान उपरोक्त बाबी लक्षात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. यासाठी भाजपने साखळी उपोषण आणि आंदोलने केली होती. राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीमध्ये सरकारी अधिकारी असल्यामुळे या घटनेची निष्पक्ष चौकशी होणार नसल्याची शंका घेत न्यायालयीन चौकशी करण्याचीही मागणी भाजपने केली होती. सरकार सत्य लपवीत असल्याचा आरोप करीत घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून पीडित कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्याचीही मागणी भाजपने केली होती. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बालकांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागात पहाटे अडीच वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. यात या कक्षात भरती असलेल्या १७ बालकांपैकी १० बालकांचा मृत्यू झाला होता, तर सात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. मृत बालकांच्या मातांमध्ये हिरकन्या हिरालाल भानारकर (मुलगी, रा. उसगाव), प्रियंका जयंत बसेशंकर (मुलगी, रा. जांब), योगिता विकेश धुळसे (मुलगा, रा. श्रीनगर/पहेला), सुषमा पंढरी भंडारी (मुलगी, रा. मोरगाव अर्जुनी, जि.गोंदिया), गीता विश्वनाथ बेहरे (मुलगी, रा. भोजापूर), दुर्गा विशाल रहांगडाले (मुलगी रा. टाकला), सुकेशनी धर्मपाल आगरे (मुलगी, रा. उसरला), कविता बारेलाल कुंभारे (मुलगी, रा. सितेसारा, तुमसर), वंदना मोहन सिडाम (मुलगी, रा.रावणवाडी,भंडारा) यांचा समावेश आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com