मुन्नाच्या विरोधात तक्रार देणाऱ्या महिलेच्या आईला मारहाण, कागदपत्रे चोरून नेली... - beating the mother of the women who logged complaint against munna stealing documents | Politics Marathi News - Sarkarnama

मुन्नाच्या विरोधात तक्रार देणाऱ्या महिलेच्या आईला मारहाण, कागदपत्रे चोरून नेली...

अनिल कांबळे
सोमवार, 15 मार्च 2021

पीडितेवर तक्रार परत घेण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप आहे. ३ मार्चला अज्ञात आरोपींनी महिलेच्या घरावर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या होत्या. तर, शनिवारी गुंड दुर्गेश पसेरकर आणि त्याच्या टोळीने महिलेच्या आईच्या घराला आग लावली. त्यांच्या ७० वर्षीय आईला मारहाण करून आगीत लोटण्याचा प्रयत्न केला.

नागपूर : राज्य कामगार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना ऊर्फ ओमप्रकाश यादव व कथित सामाजिक कार्यकर्ता पंजू तोतवानी यांनी प्लॉटच्या व्यवहारात एका महिलेची फसवणूक केली. तिने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर मुन्ना आणि त्याच्या साथीदारांविरोधा गुन्हे दाखल झाले. त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी गुंडांकडून त्या महिलेवर दबाव येऊ लागला. ती दबावाला जुमानली नाही. त्यामुळे तीचे घर पेटवून आईला मारहाण करण्यात आली. गुंडांनी घराची कागदपत्रेही चोरून नेली. जिवितास धोका असल्याची तक्रार महिलेने दिली आहे. 

सोनेगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पीडित महिला इंद्रप्रस्थनगरात आईसह राहते. त्या महिलेने काही दिवसांपूर्वीच प्लॉटच्या खरेदी-विक्रीच्या वादातून मुन्ना यादव, पंजू तोतनानी यांच्यासह चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. एमआयडीसी पोलिसांनी मुन्ना यादव आणि पंजू तोतवानीवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हासुद्धा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी फरार आहेत. 

त्यानंतर पीडितेवर तक्रार परत घेण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप आहे. ३ मार्चला अज्ञात आरोपींनी महिलेच्या घरावर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या होत्या. तर, शनिवारी गुंड दुर्गेश पसेरकर आणि त्याच्या टोळीने महिलेच्या आईच्या घराला आग लावली. त्यांच्या ७० वर्षीय आईला मारहाण करून आगीत लोटण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजारी धावून आल्याने वृद्धा वाचल्याचे सांगितले जाते. 

हेही वाचा : झेडपीच्या निवडणुकीबाबत संभ्रम, पण इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू...

दरम्यान, आरोपींनी फिर्यादी महिलेकडील काही दस्तऐवज जाळले, तर काही दस्तऐवज चोरून नेल्याचा आरोप आहे. पोलिस उपायुक्त नुरुल हसन व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सागर यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पीडित महिलेने माझ्या कुटुंबीयास धोका असल्याचे सांगून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख