भाजपला शिवसेनेची गरज नाही? नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा सवाल

लोकसभा आणि विधानसभेसाठी युतीची घोषणा झाली असली, तरी नागपूरमध्ये सत्ताधारी भाजप भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमाचे निमंत्रणही देत नसल्याने नागपुरातील शिवसैनिक चांगलेच खवळले आहेत. आमची मते नको असेल आणि गरजही वाटत नसेल तर तसे भाजपने तसे सांगावे, असा इशारा शिवसेनेचे नागपूर जिल्हा प्रमुख व माजी खासदार प्रकाश जाधव यांनी भाजपला दिला आहे.
भाजपला शिवसेनेची गरज नाही? नागपूर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा सवाल

नागपूर :  लोकसभा आणि विधानसभेसाठी युतीची घोषणा झाली असली, तरी नागपूरमध्ये सत्ताधारी भाजप भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमाचे निमंत्रणही देत नसल्याने नागपुरातील शिवसैनिक चांगलेच खवळले आहेत. आमची मते नको असेल आणि गरजही वाटत नसेल तर तसे भाजपने तसे सांगावे, असा इशारा शिवसेनेचे नागपूर जिल्हा प्रमुख व माजी खासदार प्रकाश जाधव यांनी भाजपला दिला आहे.

लोकसभेची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्‍यता असल्याने भाजपने उद्‌घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू केला आहे. बुधवारी दिवसभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भूमिपूजन व लोकार्पण करण्यात व्यग्र आहेत. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात 10 ते 12 कार्यक्रम ठेवले आहेत. यात मेट्रो रेल्वे, अजनी रेल्वे स्थानकाजवळ इंटर मॉडेल स्टेशन या मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या कार्यक्रमांना झाडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. निमंत्रणपत्रिकेत फक्त भाजपच्याच नेत्यांच्या नावांचा उल्लेख आहे.

शिवसेनेच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांना साधे निमंत्रणही पाठविले नाही. यामुळे प्रकाश जाधव चांगलेच चिडले आहेत. भाजपला आमची गरज नसेल तर आम्हालाही अशी युती नको आहे, असे त्यांनी बजावले. अशा युतीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही अपेक्षा नाही. युती केली म्हणजे आम्ही मानसन्मान गहाण टाकला नाही. आम्ही आमची ताकद लोकसभेच्या निवडणुकीत दाखवू, असेही प्रकाश जाधव यांनी सांगितले. युती केली म्हणजे आम्ही मानसन्मान विकला नाही. शिवसेनेला साधे निमंत्रणही दिले जात नसेल तर युतीची गरज काय. अशी युती आम्हाला मान्य नाही. याची वरिष्ठ पातळीवर तक्रार केली जाईल. भाजपला गरज नसेल तर तसे त्यांनी स्पष्ट सांगावे. लोकसभेत आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com