nagpur-devendra-fadanvis-nitin-gadkari | Sarkarnama

मुख्यमंत्री बदलणार नाही : नितीन गडकरी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत असल्याने बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत असल्याने बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यात हिंसक घटना
होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांना बदलण्यात येईल,
अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होती. या चर्चेला गडकरी यांनी पत्रकारांशी
बोलताना पूर्णविराम दिला.

ते म्हणाले, की काही जण मुद्दाम जातीचे राजकारण करीत आहे. यातून राज्याचे कोणतेही भले होणार नाही. फडणवीस चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करीत आहे. परंतु काही जणांना जातीच्या नावावर समाजात विष कालवण्याचे काम करावयाचे आहे. 

संपूर्ण भाजप फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

सामाजिक व आर्थिकदृष्टया मागास असलेल्या समाजाला आरक्षण देण्याची घटनेत तरतूद आहे. त्या आधारावर मागासलेल्या समाजाचे रक्षण व्हावे, हीच राज्य व केंद्र सरकारची भूमिका आहे. 

आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु हिंसेतून काहीही साध्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख