कुख्यात आंबेकरचे इतवारीतील अस्तित्व संपुष्टात, कार्यालयसुद्धा जमीनदोस्त

कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या इतवारीतील हमालपुऱ्यातील बंगल्यासोबत त्याचे अलिशान कार्यालयावरही बुलडोजर चालवून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले
Nagpur Corporation Demolished Goons Banglow.
Nagpur Corporation Demolished Goons Banglow.

नागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या इतवारीतील हमालपुऱ्यातील बंगल्यासोबत त्याचे अलिशान कार्यालयावरही बुलडोजर चालवून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. त्यामुळे त्याचे इतवारीतील अस्तित्वच संपुष्टात आले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मंगळवारपासून महापालिकेने त्याचा बंगला पाडण्याची कारवाई सुरू केली. मंगळवारी उरले सुरले बांधकाम पांडण्यात आले. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात बुलडोजर चालवून आंबेकरचे अलिशान कार्यालय पाडण्यात आले. आंबेकरने तीन प्लॉटला जोडून मोठा बंगला बांधला होता. त्याचा एक प्लॉट नेहा संतोष आंबेकर हिच्या नावे होता. ज्याचे 60.15 चौरस मिटर बांधकाम हे अनधिकृत होते. दुसऱ्या प्लॉटवर 721.56 चौरस मिटर अनधिकृत निर्माण कार्य केले होते. तिसरा प्लॉट संतोष आंबेकरच्या स्व:तच्या नावावर होता. त्याचे 21.30 चौरस मीटर बांधकाम हे देखील अनधिकृत होते. अतिक्रमण विरोधी पथकाने 2 जेसीबी व 1 पोकलेनच्या मदतीने बांधकाम पाडण्याची कारवाई केली.

बंगल्याला 'बॉलीवूड' टच

आंबेकरने घरातील बंगल्याचे डिझाईन करण्यासाठी बॉलीवूडमधील नामांकित नेपथ्यकारास बोलावले होते. फर्निचरहीसुद्धा तसेच तयार केले होते. एवढेच नव्हे तर जयपूरवरून कारागिर बोलावले होते. त्यांच्या हातून खास जयपूरी डिझाईन करून घेतले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com