`दिल्ली दरबारी' नेत्यांमुळे जिल्हा कॉंग्रेसच्या उपाध्यक्षांचा राजीनामा

रामटेक लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा झालेला पराभव आणि दिल्लीतील नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून प्रकाश वसू यांनी जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तसेच प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या विभागीय बूथसमन्वयकपदाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला आहे. त्यात त्यांनी यापुढे आपण एक कार्यकर्ता म्हणून कॉंग्रेसचे काम करणार असल्याचे म्हटले आहे.
`दिल्ली दरबारी' नेत्यांमुळे जिल्हा कॉंग्रेसच्या उपाध्यक्षांचा राजीनामा

नागपूर : रामटेक लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा झालेला पराभव आणि दिल्लीतील नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून प्रकाश वसू यांनी जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तसेच प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या विभागीय बूथ समन्वयकपदाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला आहे. त्यात त्यांनी यापुढे आपण एक कार्यकर्ता म्हणून कॉंग्रेसचे काम करणार असल्याचे म्हटले आहे. 

वसू यांनी आपल्या राजीनाम्यात कुणाचेही नाव घेतले नसले तरी "दिल्लीतील दरबारी' नेत्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांचा रोष राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे. वासनिक यांनी विदर्भातील तिकीट वाटपात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

कॉंग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी उन्हातान्हात फिरले. सभा, बैठका घेतल्या. मात्र दिल्लीत बसून राजकारण करणाऱ्यांना त्याचे काही सोयरसूतक नव्हते. भाजपचा पराभव करण्याची क्षमता असलेले प्रबळ उमेदवार देण्याऐवजी त्यांनी फक्त स्वतःची राजकीय सोय बघून, आपल्या सग्यासोयऱ्यांना तिकिट वाटप केले. अशा दरबारी नेत्यांमुळे
कॉंग्रेसला वाईट दिवस आले. आजही याच दरबारी नेत्यांची दिल्लीत चलती आहे. त्यांच्यापासून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मुक्ती पाहिजे आहे. दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, अशी विनंतीही प्रकाश वसू यांनी या माध्यमातून केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com