नागपुरातील कॉंग्रेस नेत्यांची भांडणे सुरुच; कसे लढणार विधानसभा ? 

संत्रानगरी नागपुरात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखत कार्यक्रमाला कॉंग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष नितीन राऊत अनुपस्थित राहिले. त्यांचे समर्थक तसेच शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनीसुद्धा अनुपस्थित राहून एकप्रकारे पक्षाच्या मुलाखतीवर बहिष्कार टाकला.
नागपुरातील कॉंग्रेस नेत्यांची भांडणे सुरुच; कसे लढणार विधानसभा ? 

नागपूर - संत्रानगरी नागपुरात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखत कार्यक्रमाला कॉंग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष नितीन राऊत अनुपस्थित राहिले. त्यांचे समर्थक तसेच शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनीसुद्धा अनुपस्थित राहून एकप्रकारे पक्षाच्या मुलाखतीवर बहिष्कार टाकला. 

निवडणुक जवळ आली असतानाही कॉंग्रेस नेत्यांची आपसातील भांडणे मिटली नाहीत. त्यामुळे शिस्तबद्ध भाजपच्या विरोधात कॉंग्रेस नेते कसे लढणार, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

कॉंग्रेस नेत्यांमधील आधीच वाद विकोपाला गेले आहेत. मुत्तेमवार-ठाकरे विरुद्ध राऊत-चतुर्वेदी असे दोन गट पडले आहे. यापैकी सतीश चतुर्वेदी यांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेतील दारुण पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्व सोपविले. समन्वयासाठी त्यांच्या दिमतीला चार कार्याध्यक्ष नियुक्त केले आहे. त्यात नितीन राऊत यांचाही समावेश आहे. विधानसभा जवळ येऊन ठेपल्याने सर्व एकत्र येतील, मतभेद विसरून कामाला लागतील अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मागील निवडणूक प्रफुल्ल गुडधे यांनी लढविली होती. तेच दक्षिण-पश्‍चिमचे प्रबळ दावेदार मानले जातात. नरेंद्र जिचकार पश्‍चिममध्ये सक्रिय झाले आहेत. राऊत यांच्या स्वागताचे भले मोठे होर्डिंग त्यांनी शहरात लावले होते. पूर्वमधून महापालिकेतील गटनेते तानाजी वनवे इच्छुक आहेत. स्वतः नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल उत्तरमधून उमेदवारी मागत आहे. मध्यमधून माजी मंत्री अनीस अहमद यांनी अद्यापही आपला दावा सोडलेला नाही. अलीकडेच कॉंग्रसमध्ये दाखल झालेले आणि दक्षिणमधून लढण्यास इच्छुक असलेले प्रमोद मानमोडे यांपैकी एकानेही मुलाखतींना हजेरी लावली नाही. 

वासनिकांवर राग ? 
नितीन राऊत यांनी रामटेक लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. अनुसूचित जाती विभागाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. येथे दुसरा कोणी प्रबळ उमेदवार नव्हता. त्यामुळे राऊत यांचे नाव शेवटपर्यंत आघाडीवर होते. आपल्याला सहज तिकीट मिळेल, असे राऊतांनाही वाटत होते. मात्र, शेवटच्या क्षणी पक्षाने किशोर गजभिये यांच्या नावाला पसंती दिली. यावरून राऊत यांचे वासनिक यांच्यासोबत मतभेद झाले होते. वासनिक यांनीच तिकीट कापल्याचा राऊत समर्थकांचा आरोप आहे. त्यामुळे राऊत यांनी मुलाखतींना अनुपस्थित राहून नाराजी दर्शवल्याचे समजते. 

ठाकरे नकोच 
प्रदेशाध्यक्ष बदलले असले तरी शहर कॉंग्रेस कमिटी विकास ठाकरे यांच्याच ताब्यात आहे. राऊत समर्थकांचा ठाकरे यांच्या नेतृत्वावर रोष आहे. त्यांना हटविण्याची मागणी आहे. विशेष म्हणजे महापालिकेचा विरोधीपक्षनेता निवडताना प्रदेश प्रभारी म्हणून नसीम खान यांना पाठविले होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांना झुकते माप दिले होते. गुडधेऐवजी संजय महाकाळकर यांना विरोधी पक्षनेतेपद दिले होते. याचाही रोष असल्याने गुडधे, वनवे, जिचकार मुलाखतींकडे फिरकले नाहीत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com