कॉंग्रेसच्या तिन्ही मुख्यमंत्र्यांचा नागपुरात सत्कार 

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्याची योजना नागपूर शहर कॉंग्रेस समितीने तयार केली आहे. या संदर्भात तिन्ही मुख्यमंत्र्यांना रितसर निमंत्रणे कॉंग्रेस समितीतर्फे पाठविण्यात आली आहेत.
कॉंग्रेसच्या तिन्ही मुख्यमंत्र्यांचा नागपुरात सत्कार 

नागपूर : कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्याची योजना नागपूर शहर कॉंग्रेस समितीने तयार केली आहे. या संदर्भात तिन्ही मुख्यमंत्र्यांना रितसर निमंत्रणे कॉंग्रेस समितीतर्फे पाठविण्यात आली आहेत. 

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा अखेर टप्पा येत्या 8 जानेवारीपासून नागपुरातून सुरू होत आहे. ही जनसंघर्ष यात्रा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यातून परत नागपुरात येणार आहे. या यात्रेचा समारोप येत्या 13 जानेवारीला नागपुरात होणार आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांमध्ये कॉंग्रेसला यश मिळाले आहे. या तिन्ही राज्यात कॉंग्रेसने विजयश्री खेचून आणल्याने उत्साहाचे वातावरण आहे. या समारोपाच्या कार्यक्रमासाठी तिन्ही मुख्यमंत्र्यांना बोलावून शहरात कॉंग्रेसमय वातावरण निर्मिती करण्याचा शहर कॉंग्रेस समितीचा इरादा आहे. यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह बघेल यांना रितसर निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. 

जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाला प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिाकार्जुन खरगे, कॉंग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू उपस्थित राहणार आहेत. 

नागपूर शहर कॉंग्रेस समितीने तिन्ही मुख्यमंत्र्यांना निमंत्रणे पाठविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या संदर्भात बोलताना नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, कॉंग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. यासाठी कॉंग्रेसच्या या तिन्ही मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले आहे. 

नागपुरातून कॉंग्रेसला नेहमीच उर्जा मिळाली आहे. या तिन्ही राज्यांमधील कॉंग्रेसचा विजय विशेष असल्याने व या तिन्ही मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्याचे नागपूर शहर कॉंग्रेस समितीने ठरविल्याचे ठाकरे यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com