नागपूर कॉंग्रेसमधील असंतुष्टांना मध्यप्रदेशात काम 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी नागपूरमधील असंतुष्ट कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे विविध जिल्ह्यातील प्रभारी व समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात माजी आमदार अशोक धवड, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे तसेच माजी मंत्री अनीस अहमद यांचा समावेश आहे. नागपूरमधील नेत्यांना प्रामुख्याने मध्य प्रदेशात पाठविण्यात आले आहेत.
नागपूर कॉंग्रेसमधील असंतुष्टांना मध्यप्रदेशात काम 

नागपूर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी नागपूरमधील असंतुष्ट कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे विविध जिल्ह्यातील प्रभारी व समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात माजी आमदार अशोक धवड, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे तसेच माजी मंत्री अनीस अहमद यांचा समावेश आहे. नागपूरमधील नेत्यांना प्रामुख्याने मध्य प्रदेशात पाठविण्यात आले आहेत. 

स्थानिक पातळीवरील गटबाजी नियंत्रणात आणावी तसेच, प्रचारासाठी यंत्रणाला कामाला लावून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी प्रभारींवर आहे. प्रभारींनी प्रदेश उपाध्यक्ष चंद्रप्रकाश शेखर यांच्याशी समन्वय साधण्याची सूचना कॉंग्रेसचे सरचिटणीस व मध्य प्रदेशचे प्रभारी दीपक बाबरिया यांनी केली आहे. 

माजी खासदार गेव्ह आवारी यांच्याकडे बैतुल, माजी मंत्री अनीस अहमद यांच्याकडे छिंदवाडा, माजी आमदार अशोक धवड यांच्याकडे इंदोर जिल्ह्यातील प्रभारी व समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपुरातील मुत्तेमवार-ठाकरे विरोधी गटातील असंतुष्ट नेत्यांमध्ये या तिघांचाही समावेश होतो. 
असंतुष्ट गटाकडून यापूर्वी झालेल्या शक्तिप्रदर्शनात ही नेतेमंडळी आघाडीवर होती. गोंदियाचे आमदार गोपाल अग्रवाल यांच्याकडे बालाघाट जिल्ह्याची जबाबदारी आहे. 

समन्वय साधण्याचा प्रयत्न 
कॉंग्रेसमध्ये पुनर्प्रवेश झालेले माजी आमदार आशीष देशमुख यांच्याकडे नरसिंहपूर असून पंधरवड्यापूर्वी त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रभारींच्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारसंघात समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश पांडे राजस्थानचे प्रभारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत असून राजस्थानमध्ये नागपूरसह राज्यातील काही नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com