कॉंग्रेस म्हणतेय बी पॉझेटिव्ह, पुढचे लक्ष्य नागपूर महानगरपालिका

विधानसभेच्या निकालानंतर कॉंग्रेसमध्ये फक्त चैतन्यच आले नसून अनेक सकारात्मक बदल घडू लागले आहेत. एरवी देवडियाची पायरी न चढणाऱ्या अनेक नेत्यांची पायधूळ कॉंग्रेस पक्षकार्यालयाला लागत आहे. यापुढे केवळ पॉझिटिव्हच चर्चा करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
कॉंग्रेस म्हणतेय बी पॉझेटिव्ह, पुढचे लक्ष्य नागपूर महानगरपालिका

नागपूर ः विधानसभेच्या निकालानंतर कॉंग्रेसमध्ये फक्त चैतन्यच आले नसून अनेक सकारात्मक बदल घडू लागले आहेत. एरवी देवडियाची पायरी न चढणाऱ्या अनेक नेत्यांची पायधूळ कॉंग्रेस पक्षकार्यालयाला लागत आहे. यापुढे केवळ पॉझिटिव्हच चर्चा करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

शहर कॉंग्रेसच्यावतीने नवनिर्वाचित आमदार विकास ठाकरे यांच्यासह मध्यचे उमेदवार बंटी शेळके, दक्षिणचे गिरीश पांडव, पूर्वचे पुरुषोत्तम हजारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास ठाकरे यांनी आता आपल्याला महापालिकेची निवडणूक जिंकायची असल्याने फक्त सहकारात्मक चर्चा करण्याची सूचना केली. ती सर्वांनी मान्यसुद्धा केली. यावेळी त्यांनी महापालिका जिंकण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे निर्देश दिले. त्याकरिता जनतेच्या संपर्कात राहा आणि प्रत्येक बुथ कमेटीमध्ये 15 कार्यकर्त्यांचा समावेश करा, अशी सूचनाही केली.

सहा नोव्हेंबरापासून महागाईच्या विरोधात आंदोलन करायचे आहे. 15 नोव्हेंबरनंतर जनतेच्या समस्या घेऊन महापालिकेवर धडक द्यायची आहे. हिवाळी अधिवेशनात जनसामान्यांच्या समस्या घेऊन विधानसभेवर मोर्चे काढायचे असल्याचा कार्यक्रमही यावेळी ठाकरे यांनी दिला. लवकरच सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची बैठक घेण्यात येईल. पद्‌वीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याची सूचनाही ठाकरे यांनी केली.

बैठकीला अभिजित वंजारी, प्रशांत धवड, अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री, डॉ. गजराज हटेवार, दिनेश बानाबाकोडे, हरीश ग्वालवंशी, अतुल लोंढे, संजय महाकाळकर, जयंत लुटे, इर्शाद अली, प्रवीण आग्रे, संदेश सिंगलकर, बंडोपंत टेंभूर्णे, वीण बेलगे, हरीश खंडाईत, आशिष दीक्षित, रवी घाडगे, मिलिंद दुपारे, विवेक निकोसे, पंकज निघोट, राजेश कुंभलकर, दिनेश तराळ, विक्रम पनकुले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com