कॉंग्रेस नेते नरमले; ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील मते एकसारखी

ईव्हीएम मॅनेज होत असल्याची शंका दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत करण्यात आला. काही मोजक्‍या व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली. त्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची आकडेवारी सारखी निघाल्याने नागपूर जिल्हा प्रशासनाची मोठी चिंता दूर झाली. सोबतच ईव्हीएमवरील शंकाकुशंकासुद्धा दूर झाल्या आहेत आणिकॉंग्रेस नेतेसुद्धा नरमले आहेत.
कॉंग्रेस नेते नरमले; ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील मते एकसारखी

नागपूर : ईव्हीएम मॅनेज होत असल्याची शंका दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत करण्यात आला. काही मोजक्‍या व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली. त्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची आकडेवारी सारखी निघाल्याने नागपूर जिल्हा प्रशासनाची मोठी चिंता दूर झाली. सोबतच ईव्हीएमवरील शंकाकुशंकासुद्धा दूर झाल्या आहेत आणि
कॉंग्रेस नेतेसुद्धा नरमले आहेत.

जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या. कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अनेक आक्षेप नोंदवले. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यास कोर्टातही खेचले. पटोले यांच्याविरोधात प्रशासनाने पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. पटोले आणि गजभिये ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोपावर ठाम आहेत. स्ट्रॉंगरूममधील सीसीटीव्ही बंद, उमरेड येथील सीसीटीव्ही व डीव्हीआर चोरीला केल्याने त्यांच्या शंकेत तथ्य असल्याचेही बोलले जाते. राज्य निवडणूक आयोगाच्या चमूनेही तक्रारींची दखल घेतली होती. चौकशीसुद्धा केली. या सर्व पार्श्‍वभूमीवर व्हीव्हीपॅटच्या मोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात तफावत आढळली असती, तर कॉंग्रेसतर्फे मोठे भांडवल करण्यात आले असते. त्यामुळे प्रशासनही दडपणात होते.

न्यायालयाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याचे आदेश दिले होते. सहा विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण 30 व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात आली. ईव्हीएमध्ये झालेले पक्षनिहाय मतदान आणि व्हीव्हीपॅटवर असलेल्या मतदानाचा आकडा एकच असल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com