पराभूत कॉंग्रेस उमेदवाराच्या जाहिरातीची यवतमाळात चर्चा

यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचा विजय झाला. कॉंग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचा पराभव झाला. निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांकडून आरोप, प्रत्यारोप आणि भानगडी होताना नेहमीच बघायला मिळते. पण बाळासाहेबांनी पराभव खिलाडू वृत्तीने स्विकारत दुसऱ्याच दिवशीच्या वर्तमानपत्रात मदन येरावार यांच्या अभिनंदनाची जाहीरात दिली. या जाहीरातीची जिल्हाभरात मोठी चर्चा झाली.
Madan Yerawar - Balasaheb Mangulkar
Madan Yerawar - Balasaheb Mangulkar

नागपूर : यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचा विजय झाला. कॉंग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांचा पराभव झाला. निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांकडून आरोप, प्रत्यारोप आणि भानगडी होताना नेहमीच बघायला मिळते. पण बाळासाहेबांनी पराभव खिलाडू वृत्तीने स्विकारत दुसऱ्याच दिवशीच्या वर्तमानपत्रात मदन येरावार यांच्या अभिनंदनाची जाहीरात दिली. या जाहीरातीची जिल्हाभरात मोठी चर्चा झाली.

तिकडे कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहीत पवार यांनी विजयी झाल्यानंतर प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार राम शिंदे यांच्या घरी जाऊन सत्कार स्विकारला. त्यामुळे जय-पराजय कसा स्विकारावा, हे पवार आणि मांगुळकर यांच्याकडून शिकावे, असे संदेश समाजमाध्यमांवर गेल्या तीन दिवसांत व्हायरल झाले.

मांगुळकरांनी दिलेल्या जाहीरातीमध्ये त्यांनी निवडून आलेले आमदार मदन येरावार यांचे अभिनंदन केले. "राजकीय लढाई संपली, आता समस्या संपवा', अशी मागणी केली. "निवडणुकीच्या मैदानात कोण पुढे गेले हे महत्वाचेच, पण कोणते मुद्दे पुढे गेले, अन कोणते प्रश्‍न सुटले, हे सर्वात महत्वाचे', असे म्हणत यवतमाळकरांचे सर्व प्रश्‍न तुमच्या हातून सुटावे, अशी अपेक्षा शुभेच्छा जाहीरातीच्या माध्यमातून येरावार यांच्याकडून त्यांनी केली आहे. या कृतीमुळे जिल्हाभरातून बाळासाहेबांवर प्रत्यक्ष आणि समाजमाध्यमांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जय आणि पराभव कसा स्विकारायचा हे महाराष्ट्राने रोहीत पवार आणि बाळासाहेब मांगुळकर यांच्याकडून शिकावे, यांसह बरेच संदेश समाजमाध्यमांवर गेल्या तीन दिवसांत व्हायरल झाले. कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहीत पवार यांनी विजयी झाल्यानंतर आपले प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशिर्वाद घेतले आणि सत्कार स्विकारला. आणि ईकडे यवतमाळात बाळासाहेब मांगुळकरांनी पराभूत झाल्यानंतर विजयी उमेदवार मदन येरावार यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com