सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहेरा म्हणून पुढे केले असते तर....: आशीष देशमुख

''सुरुवातीला महाआघाडी कमजोर वाटली तरी नंतर नंतर महाआघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली. प्रचारादरम्यान महाआघाडीजवळ महायुतीप्रमाणे चेहरा नव्हता. सुप्रिया सुळेंसारखा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जर पुढे केला असता, तर कदाचित विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगळे राहीले असते,'' असे मत दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढलेले कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी येथे व्यक्त केले.
Ashish Deshmukh - Supriya Sule
Ashish Deshmukh - Supriya Sule

नागपूर : ''सुरुवातीला महाआघाडी कमजोर वाटली तरी नंतर नंतर महाआघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली. प्रचारादरम्यान महाआघाडीजवळ महायुतीप्रमाणे चेहरा नव्हता. सुप्रिया सुळेंसारखा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जर पुढे केला असता, तर कदाचित विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगळे राहीले असते,'' असे मत दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढलेले कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी येथे व्यक्त केले.

''विदर्भात महाआघाडीचे काही उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले. नागपुरात पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके अखेरच्या फेऱ्यांमध्ये थोड्याच फरकाने हरले. उण्यापुऱ्या दहा ते बारा दिवसांत सत्ताधारी बलाढ्य भाजपसोबत शर्थीची टक्कर देऊन कॉंग्रेसच्या मताधिक्‍यात आघाडीच्या उमेदवारांनी लक्षणीय वाढ केली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या विदर्भातील अशा पराभूत उमेदवारांचा सत्कार येत्या तीन नोव्हेंबरला करण्यात येणार आहे," असे देशमुख म्हणाले. 

नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कापल्यानंतर "चंद्रशेखर बावनकुळे आमच्या पक्षातील हिरा आहेत. त्यांना मंत्रीपदापेक्षा मोठे पद देऊ'', असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणविसांनी आता बावनकुळेंना थेट मुख्यमंत्रीच बनवावे आणि आपला शब्द खरा करावा. कारण त्यांच्या मंत्रीपदापेक्षा तेच मोठे पद असल्याचा टोला त्यांनी देशमुख यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, "कार्यशैली आणि क्षमता दाखविण्याला वयाचे बंधन नसते, हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दाखवून दिले. पायाला चक्री लावून या निवडणुकीत महाराष्ट्रभर त्यांनी जो झंझावात उभा केला. त्यापासून प्रेरणा घेऊन आज आघाडीचे अनेक कार्यकर्ते आगामी लढाया लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परीषद निवडणुकांमध्ये त्याचे परीणाम बघायला मिळतील,'' 

गृहमंत्री बदलण्याची 'हीच योग्य वेळ'
नागपूर शहरात आज सकाळी कुण्यातरी पक्षाचे बॅनर फाडण्याच्या वादातून खून झाला. त्यामुळे नागपुरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. गृहमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात त्यांना गुन्हेगारीवर अंकुश ठेवता आला नाही. त्यामुळे राज्याचा गृहमंत्री बदलण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही डॉ. आशीष देशमुख म्हणाले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com