आयुक्त तुकाराम मुंढेंनी अद्याप महापौरांनाही वेळ दिला नाही

नागपूर महानगरपालिकेचे यापूर्वीचे आयुक्त अभिजित बांगर यांना मंजूर केलेल्या कामांना विद्यमान आयुक्त तुकारांम मुंढे यांनी अद्याप कार्यादेश दिलेले नाहीत. आयुक्तांकडून नगरसेवकांना भेटीसाठी वेळ दिली जात नाही. येवढेच नव्हे तर आयुक्तांनी महापौरांनाही भेटीला वेळ दिली नसल्याची बाब नगरसेवकांनी `सरकारनामा'ला सांगितली. माजी महापौर नंदा जिचकार आयुक्तांना भेटायला गेल्या असता त्यांनाही प्रतिक्षा करावी लागल्याची माहीती आहे.
nagpur commissioner mundhe yet to give time to meet mayor 
nagpur commissioner mundhe yet to give time to meet mayor 

नागपूर ः नागपूर महानगरपालिकेचे यापूर्वीचे आयुक्त अभिजित बांगर यांना मंजूर केलेल्या कामांना विद्यमान आयुक्त तुकारांम मुंढे यांनी अद्याप कार्यादेश दिलेले नाहीत. आयुक्तांकडून नगरसेवकांना भेटीसाठी वेळ दिली जात नाही. येवढेच नव्हे तर आयुक्तांनी महापौरांनाही भेटीला वेळ दिली नसल्याची बाब नगरसेवकांनी `सरकारनामा'ला सांगितली. माजी महापौर नंदा जिचकार आयुक्तांना भेटायला गेल्या असता त्यांनाही प्रतिक्षा करावी लागल्याची माहीती आहे.

अतिक्रमण काढून किंवा केवळ फुटपाथ मोकळे करुन शहराचा विकास होणार नाही, तर प्रलंबित कामे मार्गी लावण्याचीही तेवढीच गरज असल्याचे पालिकेचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, नगरसेवक किशोर जिचकार आणि माजी नगरसेवक मनोज साबळे म्हणाले. हॉकर्स झोनमधून दुकानदारांना हटविण्याचा अधिकार कुणालाही नाही. कारण उच्च न्यायालयाने तसे आदेश दिलेले आहेत. आयुक्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावत आहेत, ही चांगली बाब आहे. पण एखादा कर्मचारी सकाळी 10 वाजता आला असेल आणि कार्यालयाची गरज म्हणून त्याला रात्री 12 वाजेपर्यंत कार्यरत रहावे लागले, तर त्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता येण्याची सक्ती आयुक्त करु शकत नाही. तसे केलेही तरी संबंधित कर्मचाऱ्याला आयुक्त "ओव्हरटाईम' देणार आहेत का, असा प्रश्‍न तानाजी वनवे यांनी उपस्थित केला आहे.

नगरसेवक जनतेच्या समस्या घेउन आयुक्तांकडे जात असतात. तेव्हा आयुक्तांनी नगरसेवकांना वेळ दिली पाहीजे. आठवड्याला एक किंवा दोन दिवस नगरसेवकांसाठी राखीव ठेवले पाहीजे. पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवकांना सोबत घेऊन आयुक्तांनी काम केले पाहीजे, अशी अपेक्षा नगरकेवकांनी व्यक्त केली. महापालिकेत अनेक आयुक्तांसोबत काम केलेले बरेच ज्येष्ठ नगरसेवक आहेत. पण आजवर कुण्याही आयुक्तांनी नगरसेवकांना अशी वागणूक दिली नसल्याचे या नगरसेवकांचे म्हणणे आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com