प्रवीण दटकेंचे शहराध्यक्षपद म्हणजे आमदारकीची पहिली पायरी?

माजी महापौर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण दटके यांची भाजपच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवे यांनी काल रात्री या नियुक्तीचा आदेश जारी केला.
प्रवीण दटकेंचे शहराध्यक्षपद म्हणजे आमदारकीची पहिली पायरी?

नागपूर : माजी महापौर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव प्रवीण दटके यांची भाजपच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवे यांनी काल रात्री या नियुक्तीचा आदेश जारी केला. 

गेल्या काही वर्षात जे भाजपचे शहराध्यक्ष राहीले, त्यांनाच पुढे
पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी दिली गेली आणि ते आमदार झाले. यामध्ये आमदार सुधाकर देशमुख, विधान परीषदेचे आमदार प्रा. अनिल सोले व आमदार गिरीष व्यास आणि आमदार सुधाकर कोहळेंचा समावेश आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर प्रवीण दटकेंना शहराध्यक्ष बनविणे म्हणजे त्यांना येत्या विधानसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली असल्याचे राजकीय जाणकारांत मानले जात आहे. 

ही नियुक्ती म्हणजे माजी शहराध्यक्ष व आमदार सुधाकर कोहळे यांना मोठा फटका आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघात कोहळेंची कामगिरी समाधानकारक नसल्याची बरीच ओरड झाली. कार्यकर्तेसुद्धा त्यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे सांगण्यात आले. अखेरच्या दिवसांत त्यांनी कार्यकर्त्यांची रसद रोखल्याचीही माहीती आहे. तेव्हा लोकसभेच्या मतदानाची तारीख नजिक आली असताना कोहळेंना "स्टॉप' करुन भाजपच्याच एका माजी आमदाराला दक्षिणची जबाबदारी दिली होती आणि त्यांनी ती समर्थपणे पार पाडल्याचे सुत्राने सांगितले. कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतल्याचाच फटका कोहळेंना बसल्याची चर्चा कालपासून भाजपच्या गोटात सुरु आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्षपदावरून हटवल्यामुळे कोहळेंना विधानसभेची उमेदवारी दिली जाणार की नाही, याबद्दलही उलटसुलट चर्चा ऐकीवात येत आहेत. तर प्रवीण
दटके कोणत्या मतदार संघातून लढणार, याचे अंदाज बांधण्यात शहरातील युवा फळीचे कार्यकर्ते मशगुल दिसताहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com