Nagpur cable issue | Sarkarnama

नागपुरात धावणार केबल कार 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 एप्रिल 2017

गेल्या काही वर्षांपासून नागपुरात विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे. याच मालिकेत आता नागपुरात केबल कार धावणार आहे. राज्यातील इतर शहरांना याबाबत मागे टाकणार आहे. 

नागपूर  : गेल्या काही वर्षांपासून नागपुरात विकास कामांचा धडाका सुरू झाला आहे. याच मालिकेत आता नागपुरात केबल कार धावणार आहे. राज्यातील इतर शहरांना याबाबत मागे टाकणार आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यानंतर नागपुरात अनेक प्रकल्पांचे काम जोमात सुरू आहे. मेट्रो रेल्वेचे काम जोरात सुरू आहे. तसेच शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांचे सिमेंटीकरण होत आहे. मिहानच्या कामाला गती आली आहे. राज्यातील पहिले आयआयएम नागपुरात सुरू झाले आहे. ट्रिपल आयटी संस्थाही सुरू झाली आहे. याशिवाय "एम्स'च्या कामाला गती आली आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता केबल कार नागपुरात सुरू होणार असल्याचे सांगितले. स्मार्ट व सस्टेनेबल सिटी संमेलनाचा समारोप गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये झाला. यावेळी त्यांनी केबल कार नागपुरात धावणार असल्याची घोषणा केली. यावेळी सार्वजनिक वाहतुकीची समस्या सुधारण्यास मदत होणार आहे. केबल कारमुळे शहराच्या वाहतुकीमध्ये निश्‍चितच भर पडणार आहे.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख