चंद्रशेखर बावनकुळे यांच्या  आश्‍वासनाचे खोटे ' शिक्के'

chandrashekhar-bhavankule
chandrashekhar-bhavankule

नागपूर :  नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देऊ केलेल्या व्यक्तीगत रोख मदतीच्या आश्‍वासनाचे शिक्के खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी देऊ केलेली मदत एक महिन्यानंतरही मिळाली नसल्याचा आरोप पीडीत कुटुंबाचे देवराम ढोलवार यांना केला आहे.

मौदा तालुक्‍यातील खात येथे शेतात किटकनाशकांची फवारणी करताना नितेश ढोलवार या 24 वर्षीय युवकाचा गेल्या 4 सप्टेंबरला मृत्यू झाला. काही दिवसांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळीच्यापूर्वी पीडीत कुटुबियांची सांत्वना भेट घेतली.

यावेळी राज्य सरकारकडून 2 लाख रुपये व व्यक्तीगतरित्या 50 हजार रुपये अशी अडीच लाख रुपयांची मदत ढोलवार कुटुंबाला देणार असल्याचे आश्‍वासन बावनकुळे यांनी दिले.

पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनाला एक महिना झाल्यानंतरही राज्य सरकारचे 2 लाख रुपयांची मदत तसेच बावनकुळे यांच्याकडून व्यक्तीगतरित्या मिळणारी 50 हजार रुपयांचीही मदत ढोलवार कुटुंबाला अद्यापही मिळाली नाही.

नागपुरातील बावनकुळे यांच्या घरी जाऊन भेटण्याचाप्रयत्न केला परंतु मंत्र्यांनी साधी भेट दिली नाही, असा आरोप देवराम ढोलवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

नागपुरातील जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी देवराम ढोलवार यांना मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

फवारणीमुळे मरण पावलेल्या कुटुंबियाला मदत करण्याऐवजी त्या कुटुंबातील सदस्यांच्या आत्महत्येची सरकार व पालकमंत्री वाट पाहत आहेत काय? असा सवाल पवार यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com