बुटीबोरीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीत काय बिनसले?

बुटीबोरी नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणूकीसाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. तर आघाडीमधील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील महत्वाचे शहर असलेल्या बुटीबोरीच्या राजकाराणावर भाजपची पकड असल्याचे युतीमुळे स्पष्ट झाले. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत काय बिनसले, याची चर्चा सुरु झाली आहे.
बुटीबोरीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीत काय बिनसले?

नागपूर : बुटीबोरी नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणूकीसाठी भाजप-शिवसेनेची युती झाली आहे. तर आघाडीमधील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील महत्वाचे शहर असलेल्या बुटीबोरीच्या राजकाराणावर भाजपची पकड असल्याचे युतीमुळे स्पष्ट झाले. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत काय बिनसले, याची चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसमध्ये सर्वच आलबेल नसल्याचे चित्र असून त्याचा परिणाम येत्या विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीवर पडू शकतो.

२३ जून रोजी होणाऱ्या बुटीबोरी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी संपली. नगराध्यक्षपदासाठी सात तर ९ प्रभागातील १८ नगरसेवकांसाठी ६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. नगराध्यपदासाठी भाजप-शिवसेना युतीचे बबलू गौतम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बबलू श्रीवास, कॉंग्रेसकडून जाकिर उर्फ बाबू पठाण यांनी उमदेवारी दाखल केली तर मंगेश वनारसे, तुषार डेरकर, डॉ. मुकेश (मूलचंद ) कापसे, राजेन्द्र भालेराव हे अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. १८ नगरसेवकांसाठी पक्षाचे ५४ उमेदवार (कॉंग्रेस, रा.कॉ. व भाजप-सेना) तर ८ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. 

१३ जूनपर्यंत अर्ज परत घेण्याची मुदत आहे. १४ तारखेला चिन्ह वाटप होणार आहे. ही निवडणूक तिरंगी होणार असे सध्यातरी वाटते. मात्र, बुटीबोरीत अद्यापही स्थानिक व स्थायिक हा वाद नागकिरांच्या मनात घर करून आहेच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com