माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटलांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भाजयुमोचे निवेदन

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी शहिद हेमंत करकरे यांच्याबद्‌दल आणि माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केले असून हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे, असे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवाणी दाणी यांनी पोलिस सहआयुक्‍त रविंद्र कदम यांना दिले आहे.
nagpur bjp youth wing submits complaint to police against ex-judge kolse patil
nagpur bjp youth wing submits complaint to police against ex-judge kolse patil

नागपूर : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी शहिद हेमंत करकरे यांच्याबद्‌दल आणि माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केले असून हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे, असे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवाणी दाणी यांनी पोलिस सहआयुक्‍त रविंद्र कदम यांना दिले आहे.

गेल्या रविवारी अलायन्स अगेन्स्ट सीसीए-एनआरसी-एनपीआरच्यावतीने नागपुरातील जाफर नगरात इदगाह मैदानावर संविधान जागरण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत कोळसे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अनेक वादग्रस्त वक्‍तव्य केल्याचा आरोप दाणी यांनी केला. कोळसे पाटील यांच्या भाषणाचे पडसाद शहरभर उमटले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या वक्‍तव्याचा निषेध व्यक्‍त करण्यात आला. तसेच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवाणी दाणी यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन पोलिस आयुक्‍त कार्यालयात सहआयुक्‍त रविंद्र कदम यांची भेट घेतली. त्यांनी कोळसे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सहआयुक्‍तांकडे लेखी तक्रार दिली. कोळसे पाटील यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कोळसे पाटील यांनी आक्षेपार्ह वक्‍तव्य केले आहे. त्यांच्या वक्‍तव्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते. अटल बिहारी वाजपेयी यांच्याविरूद्ध त्यांनी गरळ ओकली आहे. त्यांच्याविरूद्ध आम्ही लेखी तक्रार पोलिसांत केली असून त्या संदर्भातील सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी शहानिशा करून त्वरित गुन्हे दाखल करावे.
- शिवाणी दाणी, अध्यक्षा, भाजयुमो

कोळसे पाटील यांनी आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्यासंदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. तसेच एक पेनड्राईव्ह दिला आहे. स्पेशल ब्रॅंचकडून तक्रारीची चौकशी आणि शहानिशा केली जाईल. जर आक्षेपार्ह आणि कायद्याच्या विरोधात वक्‍तव्य असल्यास पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येईल.
- रविंद्र कदम, पोलिस सहआयुक्‍त

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com