नागपुरात भाजपने नगरसेवकांचे राजीनामे घेतले 

  नागपुरात भाजपने नगरसेवकांचे राजीनामे घेतले 

नागपूर ः नागपूर शहर भाजपने अचानकपणे शहरातील नगरसेवकांचे राजीनामे घेतले. या खेळीमुळे नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत नगरसेवकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे, यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. 

विदर्भातील भाजपामध्ये नाराजीचे सूर आता तीव्र होत आहे. नाना पटोले यांच्यानंतर आमदार आशीष देशमुख यांनी उघडपणे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या नाराजांमध्ये आणखी वाढ नये, यासाठी भाजपाचे नेते प्रयत्नशील आहेत. नाराजांच्या संख्येत वाढ झाल्यास पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. हे टाळण्यासाठी नगरसेवकांचे राजीनामे घेतल्याचे बोलले जात आहे. नागपूर महापालिकेत भाजपचे 108 नगरसेवक आहेत. यात अनेक नगरसेवक कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतून वेळेवर आयात केलेले आहेत. या नगरसेवकांमध्ये प्रामुख्याने नाराजी असल्याचे बोलले जात आहे. 

नागपुरातील काही नगरसेवकांनी विकास निधी मिळत नसल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महापालिकेने घेतलेल्या काही निर्णयाच्या विरोधात मत व्यक्‍त केली होती. यामुळे पक्षाच्या प्रतिमा खराब होत असून पक्षाला अडचणींना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी आता नगरसेवकांचे राजीनामे घेतल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात भाजपचे प्रवक्ता आमदार गिरीश व्यास यांनी नगरसेवकांचे राजीनामे घेणे ही भाजपची जुनी प्रथा आहे. यावर्षी पहिल्यांदा हे घडलेले नाही. यात नवे काहीही नाही. हा पक्षशिस्तीचा एक भाग असल्याचे व्यास यांनी सांगितले. 

भाजपच्या नगरसेवकांनी उघडपणे काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु खासगीमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार आमच्यावर अविश्‍वास दाखविण्यासारखा असल्याचे काही नगरसेवकांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com